शिरुरकासार प्रतिनिधी - खरवंडी -ब्रह्मनाथ येळम- आर्वी - खालापुरी- नवगन राजुरी या राष्ट्रीय महामार्ग क्र.361 फ वर दि.29 रोजी ब्रम्हनाथ येळम येथील श
शिरुरकासार प्रतिनिधी – खरवंडी -ब्रह्मनाथ येळम- आर्वी – खालापुरी- नवगन राजुरी या राष्ट्रीय महामार्ग क्र.361 फ वर दि.29 रोजी ब्रम्हनाथ येळम येथील शिवारात संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात होऊन नांदेवली येथील जालिंदर शेळके हा 30 वर्षाचा तरुण जागीच ठार झाला आहे.जालिदंर शेळके यांच्या पाठीमागे पत्नी ,दोन लहान मुली ,आई ,वडील व भाऊ असा परिवार आहे.परिवाराचा सांभाळ करणारच मृत्यू पावल्यामुळे पूर्ण कुटुंबच उध्वस्त झालेले आहे.
या रस्त्यावर ब्र. येळम शिवारात जुन्या कँम्पच्या समोर काही लांबी मध्ये रस्त्याचे काम झालेले नव्हते. या ठिकाणच्या दोन्ही बाजूला सूचनाफलक सुद्धा लावलेले नव्हते. तसेच रात्री चमकणारे स्टिकर्स पण लावलेले नव्हते. व हा भाग वाहतुकीसाठी दुरुस्त पण ठेवलेला नव्हता त्यामुळे दोन्ही बाजूकडून येणार्या मोटार सायकल स्वारांना हा अपूर्ण कामाचा लांबी चा भाग अचानक समोर आल्यामुळे ते चुकवण्यासाठी यांनी गाड्या बाजूने वळविल्या व एकमेकाला धडकल्या त्यामुळे कै. जालिंदर शेळके काँक्रीट रस्त्यावर डोक्यावर पडले व डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाले. दुसरा मोटरसायकलस्वार सुद्धा जबर जखमी झालेला आहे.या संदर्भात शिरूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान संहिता कलम 279, 337 ,338 व 304 अ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.पुढील तपास हेड कान्स्टेबल मनोज जोगदंड हे करत आहेत.कै.जालिंदर शेळके यांना एक सात वर्षाची व तीन वर्षाची मुलगी आहे व पत्नी आहे त्यामुळे या वारसांना आर्थिक मदत व पत्नीचे व मुलीचे पुनर्वसन करण्याची मागणी परिसरातून होत आहे. हा रस्ता तंदुरुस्त असता व दोन्ही बाजूने सूचना फलक जर लावले असते तर हा अपघात घडला नसता व कै. जालिंदर शेळके यांचे कुटुंब उध्वस्त झाले नसते.हा रस्ता अपूर्ण असल्यामुळे या रस्त्यावर पूर्वीसुद्धा भीषण अपघात होऊन लोकांना प्राण गमवावे लागले आहेत व बरेचसे लोक जबर जखमी झालेले आहेत.केवळ ठेकेदार काम करत नसल्यामुळे व भूसंपादन अधिकारी बीड यांच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्याचे भूसंपादन व बांध काम लवकर झाले नाही. व ठेकेदाराने वेळेवर काम केले नसल्यामुळे हा रस्ता गेल्या पाच वर्षापासून अपूर्ण आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे .
COMMENTS