Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात

सिमेंट कंटेनर घरात घुसल्याने दोन गाड्यांसह घराचे नुकसान

कल्याण प्रतिनिधी - कल्याण नगर महामार्गावर यते गावातील बांधणी पाडा दरम्यान एका घरात भरधाव सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर घुसल्याने मोठा आपघात घडल

मुंबई बंगळुरु महामार्गावर ट्रक आणि बसचा अपघात
भीषण अपघात ; कार थेट 100 फूट दरीत .
भयानक ! बस दरीत कोसळून शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू

कल्याण प्रतिनिधी – कल्याण नगर महामार्गावर यते गावातील बांधणी पाडा दरम्यान एका घरात भरधाव सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर घुसल्याने मोठा आपघात घडला असून या घटनेत घरातील कुटूंब बचावले आहे. घराचे खूप मोठे नुकसान झाले असून एक चार चाकी व एक दुचाकी चक्काचूर झाली आहे. तर कंटेनर चालक दारूच्या नशेत भर वेगाने सिमेंट भरून नेणारा कंटेनर नेत असताना गाडी वरील ताबा सुटल्याने ही घटना घडली असल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी आरोप करत सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नसल्याचे सांगत या महामार्गावर सुरक्षा भीत उभारण्यात यावी व नुकसान भरपाईची मागणी करत आहे. कल्याण नगर महामार्गावर यते गावातील बांधणी पाडा रोड वर भदाणे कुटूंब राहत असून घरात सिमेंट भरून नेणारा कंटेनर अचानक घरात घुसल्याने दोन गाड्यांसह घराचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणती जीवित हानी या घटनेत  झाली नाही. मात्र, या अपघातात घराचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सध्या भदाणे कुटूंबाने ट्रक चालक दारूच्या नशेत भर वेगाने हा कंटेनर नेत असताना गाडी वरील ताबा सुटल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप करत या प्रकरणी झालेल्या नुकसान भरपाईची मागणी करत आहे. 

COMMENTS