नाशिक प्रतिनिधी - नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमार

नाशिक प्रतिनिधी – नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात खाजगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला असून या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पुरुष, सहा महिला तर दोन चिमुकल्याचा समावेश असल्याची पोलिसांची माहिती या अपघातात खाजगी बस मध्ये 35 ते 45 प्रवासी असल्याची माहिती येत आहे पंधरा ते वीस गंभीर जखमी झाले असून या जखमींवर सिन्नर येथील खाजगी तर शिर्डी येथील सुपर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे. या अपघाता प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अधिक तपास पोलीस करत आहे .
COMMENTS