ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात

चालक गंभीर जखमी

मावळ प्रतिनिधी : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेच्या मुंबई लेनवर पहाटे साडेपाच वाजता एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यामु

अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले ‘एकनाथ’ .
 जालन्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात
भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं; ४ जणांचा जागीच मृत्यू

मावळ प्रतिनिधी : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेच्या मुंबई लेनवर पहाटे साडेपाच वाजता एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याने अज्ञात वाहनाला ठोकर देऊन रस्त्याच्या कडेला बॅरिकेट्स तोडून धडक दिली. त्यामुळे द्रुतगती मार्गावर ट्रेलर मध्येच थांबला. या अपघातात चालक जायरहुसेन गुलबुद्दीन छोटे(Jairhussain Gulbuddin Chhote)  हा चालक जबर जखमी होऊन गाडीमध्ये अडकून पडला होता. या घटनेची खबर मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, मृत्युंजय देवदूत, आणि ॲम्बुलन्स तेथे दाखल झाली. जवळपास अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर त्या जखमी चालकाला बाहेर काढण्यात यश आले. चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये(Admitted to MGM Hospital, Panvel.) दाखल केले.

COMMENTS