Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपोषण कर्ते शेख शरीफ यांची प्रकृती खालावलेली

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल

परळी प्रतिनिधी - येथे मागील चार दिवसापासून मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमचे तालुकाध्यक्ष शरीफ भाई हे आमरण उपोषण करत होते. आज उपोषणाला चौथ्या दिवशी सं

विद्यार्थ्यांसमोरच शिक्षिकांची जबरदस्त मारामारी
कर्जाची नोटीस हातात पडताच शेतकऱ्यांची आत्महत्या
तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, १७ जून २०२२ | LOKNews24 |

परळी प्रतिनिधी – येथे मागील चार दिवसापासून मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमचे तालुकाध्यक्ष शरीफ भाई हे आमरण उपोषण करत होते. आज उपोषणाला चौथ्या दिवशी संध्याकाळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच त्यात आता मुस्लीम समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. मुस्लिम आरक्षण आणि कंत्राटी भरती रद्द करावं या मागणीसाठी परळीत 13 ऑक्टोबर पासून एमआयएमचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मुस्लीम आरक्षण आणि कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीचा आदेश रद्द करा या दोन प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आले आहे. आज दुपारी परळी उपजिल्हा रुग्णालयची एक पथकांनी उपोषण स्थळ भेट देऊन उपोषणकर्त्यांची तब्येतची विचारपूस करून चेकअप केली होती .आज उपोषणचा चौथ्या दिवशी, मा.उपजिल्हाअधिकारी नम्रता चाटे मॅडम, व नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांची तब्येतची विचारपूस करून त्यांची जी मागणी आहे ते वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात आली, असा आश्‍वासन दिले आहे. परळी तालुका एम.आय.एम पक्षाचे तालुकाध्यक्ष शेख शरीफ आमरण उपोषण करित आहेत मुस्लिम समाजातील अनेक प्रश्‍नांवर आवाज उठवून समाजाची दुर्दशा झालेली असून सुध्दा महाराष्ट्र सरकार आरक्षण देत नाही हीच शोकांतिकाच, कोर्टाने 5 टक्के शैक्षणिक आरक्षण देऊन अनेक वर्षे झाली असूनदेखील राज्य सरकार मुस्लिम समाजाचा अंत पाहत आहे, असे एम.आय.एम चे शहराध्यक्ष कादर कुरेशी यांनी आपल्या भाषणात म्हणाले, यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी समाजसेवकांनी तसेच राजकीय नेत्यांनी आमरण उपोषणास भेट देऊन पाठींबा दिला होता.1)शरीफ भाई यांची तब्येत अचानक खराब झाल्याने आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले, मुस्लिम आरक्षण जो पर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील, 2) उपोषण सुरू असताना ज्या ज्या पक्षाने तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्याने आपला पाठींबा दिला त्या सर्वांचे मनापासून आभार. शहराध्यक्ष कादर कुरेशी यांनी मानले.

COMMENTS