Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांनी अ‍ॅपच्या माध्यमातून ई-पीक नोंदणी करून घ्यावी

तहसीलदार नामदेव पाटील यांचे आवाहन

देवळाली प्रवरा ः  सन 2024-25 या वर्षा करीता गाव नमुना नंबर 7/12 मध्ये खरीप हंगामाची पिक पाहणी नोंदणी सुरू झाली असल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी

सह्याद्री संस्थेने गुणवत्तेचा लौकिक कायम जपला
अनिल पावटे यांना उत्कृष्ट अध्यापन व साहित्य सेवा पुरस्कार
तायक्वांदो स्पर्धेत मानसी डोळसने पटकावले पटकावले

देवळाली प्रवरा ः  सन 2024-25 या वर्षा करीता गाव नमुना नंबर 7/12 मध्ये खरीप हंगामाची पिक पाहणी नोंदणी सुरू झाली असल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोबाईलमध्ये ई पीक पाहणी व्हर्जनच्या माध्यमातून नोंदणी करून घ्यावी. नोंदणीसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत मुदत असून शासकीय योजनांच्या लाभासाठी नोंदणी आवश्यक असल्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले.
              तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, शासनाने ऑनलाईन पिक पाहणी करण्याकरिता प सुरू केले आहे. शेतकर्‍यांनी आपल्या मोबाईलमध्ये हे प घेत आपल्या क्षेत्राची माहिती देवून पीक पाहणी नोंद करणे गरजेचे आहे. पिक पाहणी नोंद करताना अडचण आल्यास महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा. पीक पेरा नोंदविणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजना, कृषी, फलोत्पादन, नैसर्गिक आपत्ती, नुकसान, पिक विमा, शासकीय आधारभूत किंमत, धान्य खरेदी योजना, खतांवरील सबसिडी आदी योजनांच्या लाभासाठी पीक पाहणी आवश्यक आहे. पीक पेरा नोंदीसाठी आडचणी आल्यास  गावातील तलाठी कार्यालय, मंडळाधिकारी, तहसिल कार्यालयातील कूळ कायदा यांच्याशी संपर्क साधावा नोंदीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS