नाशिक प्रतिनिधी - दुग्धोत्पादक शेतकरी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी नवनवीन मार्गांच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी कारगिलने ‘मिल्कजेन १००००’ नावाचे
नाशिक प्रतिनिधी – दुग्धोत्पादक शेतकरी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी नवनवीन मार्गांच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी कारगिलने ‘मिल्कजेन १००००’ नावाचे एक नवीन डेअर फीड बाजारात आणले आहे. महाराष्ट्रातील दुग्धव्यवसायातील दुधाचा दर्जा, उत्पादकता वाढवण्यासाठी तसेच प्राण्याच्या एकंदर कल्याणासाठी ‘मिल्कजेन १००००’ उपयुक्त आहे. कारगिलने हे उत्पादन सर्वांपुढे आणण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले. ह्या कार्यक्रमांना २००हून अधिक डीलर्स व भागीदारांची उपस्थिती होती. कारगिलच्या भारतातील अॅनिमल न्युट्रिशन अँड हेल्थ विभागाचे कमर्शिअल डायरेक्टर डॉ. प्रशांत शिंदे ह्यांनी उत्पादन सर्वांपुढे आणताना, बाजारपेठेतील उदयोन्मुख प्रवाह आणि ह्या उत्पादनाचे अनेकविध लाभ ह्यांविषयी, माहिती दिली. “देशभरातील पशुखाद्य निर्माते आणि शेतकरी ह्या दोघांचा आघाडीचा पुरवठादार आणि विश्वासाचा सहयोगी होण्याच्या आमच्या इच्छेतून हे उत्पादन बाजारात आणले गेले आहे. शेती उत्पन्नाला जोड देऊन स्थानिक दुग्धोत्पादन उद्योग बळकट करण्याप्रती आमची बांधिलकी ह्यातून दिसून येते. ह्या उत्पादनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना अभूतपूर्व यश मिळवण्यात सहाय्य करण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे,” असे ते म्हणाले. भारतातील दुग्धोत्पादन क्षेत्र सातत्याने वाढत असल्यामुळे शेतकरी त्यांच्या पशुधनाची दूध देण्याची क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्याच्या दृष्टीने सुधारित खाद्य व्यवस्थापन पद्धतींना प्राधान्य देऊ लागले आहेत. ‘मिल्कजेन १००००’ हे उत्पादन विशेषत्वाने शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. वाढीव मूल्यनिर्मिती आणि प्राण्याचे आरोग्य सुधारणे हे हेतू ह्यामागे आहेत. कारगिलच्या मिश्रण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, ‘मिल्कजेन १००००’मध्ये प्रथिने आणि पिष्टमय पदार्थांचे संतुलित मिश्रण आहे. दुधाची निर्मिती वाढवण्यासोबतच, मेद (फॅट) आणि मेदाशिवाय अन्य घनपदार्थ आदी दुधातील घटक पदार्थ वाढवण्याच्या दृष्टीने ह्या उत्पादनाचा विकास परिश्रमपूर्वक करण्यात आला आहे.
COMMENTS