शेतकऱ्यांने टोकण यंत्राच्या साहाय्याने केली मका लागवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांने टोकण यंत्राच्या साहाय्याने केली मका लागवड

जळगाव प्रतिनिधी- मजुरांची शोधाशोध सुरू केल्यानंतर पुरेसे मजूर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी भास्कर तेली यांन

थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या
हातलोटमध्ये अतिवृष्टीच्या जखमा अजून ताज्याच… दहा महिन्यानंतरही प्रशासनाच्या उदासिनतेमुळे मदतीसाठी टाहो
यंदा खरीप क्षेत्र लाखाने वाढणार

जळगाव प्रतिनिधी– मजुरांची शोधाशोध सुरू केल्यानंतर पुरेसे मजूर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी भास्कर तेली यांनी टोकण यंत्राच्या साहाय्याने केवळ एकच मजूर लावून या टोकण यंत्राचा वापर करून रब्बी हंगामातील मक्याची लागवड केली. खरिपाची व रब्बीची एकत्र आलेली शेतीकामे अशातच मजुरांचा तुटवडा यामुळे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील भास्कर तेली या शेतकऱ्याने त्यांच्या शेतावर आपल्या नातेवाईकांकडुन टोकण यंत्रांच्या साहाय्याने एकाच मजूर लावून यंत्राचा वापर करून मक्याची यशस्वी लागवड केली. सध्या त्याच्या शेतातील मका लागवडीचा हा विषय चर्चेचा ठरला आहे.  खडकदेवळा येथील शेतकरी भास्कर तेली यांना आपल्या शेतात मक्याची लागवड करायची होती. त्यासाठी त्यांनी मजुरांची शोधाशोध सुरू केल्यानंतर पुरेसे मजूर उपलब्ध होत नव्हते. कारण सध्या कपाशीची वेचणी चालू असल्याने 10 रुपये किलो दराने वेचणी चालू आहे‌‌. त्यामुळे दिवसभरातून एक मंजुर 50 किलो जरी कापुस वेचणी केली तरी त्याला 500 रुपये एका दिवसाची मजुरी मिळते आणि मका लागवड करता फक्त 200 रुपये मंजूर आहे त्यामुळे मंजुर वर्ग देखील मिळत नव्हते त्यामुळे मका लागवड करता उशिर होत असल्यामुळे त्यांनी नातेवाईकांकडून टोकण यंत्रांची मदत घेऊन सुमारे अडीच एकर शेतजमीन मध्ये टोकन यंत्राच्या साहाय्याने मका लागवड केली असुन त्यांना अडीच एकर शेतजमीन साठी 10 मंजुर लागत होते परंतु या टोकण यंत्राच्या साहाय्याने त्यांच्या शेतात एकाच मजुरांच्या साहाय्याने मका लागवड केली असुन या टोकण पद्धतीने मका लागवड देखील चांगली आहे.त्यामुळे तब्बल 10 मंजुराचे काम या टोकण पद्धतीने फक्त एकाच मजुरांच्या साहाय्याने मका लागवड केली आहे.या यंत्रामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचत व मंजुरीवर होणारा पैसा सुध्दा बचत झाली असल्याचे शेतकरी भास्कर तेली यांनी सांगितले. यंत्राच्या साहाय्याने झालेली ही लागवड पाहण्यासाठी परिसातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर भेट दिली. आजच्या काळात पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करणे कशी गरजेची झाली आहे. याचा प्रत्यय भास्कर तेली यांच्या प्रयोगातून शेतकऱ्यांना येत आहे. 

COMMENTS