बीड प्रतिनिधी - वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागतो आहे. या अस

बीड प्रतिनिधी – वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागतो आहे. या अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांशी खा. प्रितमताई मुंडे यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधला आहे. टोकाच पाऊल उचलू नका तुम्हाला नुकसानभरपाई आणि मदत मिळवून देण्याची जवाबदारी लोकप्रतिनिधी या नात्याने आमची आहे. सर्व नुकसानीची मदत मिळवून दिली जाईल अशा शब्दात त्यांनी शेतकर्यांना विश्वास दिला.
मागील दोन दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे, गारपीट आणि अवेळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांची प्रचंड हानी झाली आहे. अशा परिस्थितीत मानसिक आधार देने गरजेचे असल्याचे ओळखून खा.प्रितमताई मुंडे यांनी केज तालुक्यातील डोका गावातील शेतकर्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. वैद्यकीय कारणास्तव प्रत्यक्ष पाहणीला येता आले नसले तरी जिल्ह्यातील परिस्थितीवर माझं पूर्ण लक्ष आहे. कुणीही टोकाची भूमिका घेऊ नका, झालेल्या सर्व नुकसानीची लोकप्रतिनिधी या नात्याने मदत मिळवून देणार आहे. राज्यातील सरकार शेतकर्यांप्रति संवेदनशील असलेले सरकार आहे, सर्व नुकसानीची सरकार मदत देईल. राज्याच्या मुख्यमंत्री आणि प्रशासनाला बोलून तात्काळ मदत मिळेल यासाठी मी देखील प्रयत्न करत आहे’ अशा शब्दात त्यांनी शेतकर्यांना आधार दिला. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील खा.प्रितमताई मुंडे यांनी पत्राद्वारे शासकीय मदत देण्यासाठी विनंती केली आहे. तसेच जिल्हाधिकार्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
COMMENTS