हिमायतनगर प्रतिनिधी - ऑगस्ट महिन्यातच पावसाने दडी मारल्याने पिकासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून,खरीप हंगामातील पिके पा
हिमायतनगर प्रतिनिधी – ऑगस्ट महिन्यातच पावसाने दडी मारल्याने पिकासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून,खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपण्याची येणार्या काळात शक्यता निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पडलेल्या कडक उन्हामुळे तापमानात प्रचंड उकाडा निर्माण होऊन,अनेकांना उन्हाळा असल्याचा भास निर्माण होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पिके करपण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.सध्या खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस,तुर,उडीद,मुग,तीळ तसेच पालेभाज्या पिके आदीची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे.जुलै महिन्याच्याअखेर पण पावसाने बर्यापैकी पाऊस पडल्याने शेतातील पिके देखील चांगली वाढलेली होती.परंतु ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे शेतातील खरीप हंगामातील पिके पाऊस नसल्याने माना टाकत आहेत. पाऊस नसल्याने पिकांना पाण्याची कमतरता भासु लागली आहे.सध्या सोयाबीन,कापुस,तूर यांना पाण्याची नितांतआवश्यकता भासतआहे. कारण या महिन्यात सोयाबीन,कापूस वाढीचा हंगाम असल्याने त्यांना नितांत पाण्याची गरज आहे.नैसर्गिक पाण्याचे अनेक स्त्रोत देखील कमी-अधिक प्रमाणात असल्याने जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणार्या काळात भेडसावणार आहे.तसेच बर्याच ठिकाणचे ओढे नाले आटल्याने पाण्याची धार सुद्धा कमी झालेली आहे.सध्या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता भासत आहे.तसेच शेतातील बांधा मधिल पाणी आटले असल्याने शेतात उन्हामुळे काही ठिकाणी भेगा पडून पिके करपून जाण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालीआहे.अनेक जण विहीर, विंधन विहीर या पासून उपलब्ध असणारे पाण्याचे ठिंबक व तुषार सिंचन करून पिकांना पाणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असले,तरी ज्यांच्याकडे पाणी कोणत्याच स्वरूपात उपलब्ध नाही,असे शेतकरी फक्त आभाळाकडे डोळे लावुन पावसाची वाट बघत बसलेआहे.हिमायतनगर तालुक्यात जलसंधारण व पाण्यासाठी अन्य प्रभावी योजना नसल्याने पाण्याची कमतरता भासत आहे. तसेच शेतकर्यांना जंगली वन्यप्राण्या कडून शेतातील पिकाचे सुद्धा अतोनात नुकसान सुरु असल्याने,शेतकरी मात्र निसर्ग व वन्य प्राण्यांच्या नुकसानीच्या दुहेरी संकटात सापडला आहे.यामुळे येणार्या काळात पाण्याची नितांत आवश्यकता भासणार असून,जर असाच पाण्याचा खंड पडत राहिला तर पुढच्या महिन्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही
COMMENTS