सिन्नर प्रतिनिधी/ अवकाळी पावसाने व मातीमोल बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेतून मार्गक्रमण करीत आहे. अशातच टोमॅटोला ही कव
सिन्नर प्रतिनिधी/ अवकाळी पावसाने व मातीमोल बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेतून मार्गक्रमण करीत आहे. अशातच टोमॅटोला ही कवडीमोल दर मिळत असल्यामुळे खर्च तर सोडाच गाडीभाडे ही खिशातून देण्याची वेळ सध्या शेतकर्यांवर आली आहे. कधी अवकाळी तर कधी मातीमोल बाजारभाव या दृष्ट चक्रातून मार्गक्रमण बळीराजाला यंदा एकाचवेळी दोन्ही करणार्या संकटातून मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. गेल्या महिनाभरापासून येणार्या अवकाळी अधूनमधून पावसाने सर्वच शेतीपिकांचे अतोनात नुकसान केले आहे. वादळी वारा व गारांच्या कचाट्यातून वाचलेल्या कोबी, फ्लॉवर,वांगी व टोमॅटोला सध्या रूपया दोन रूपयांचा निचांकी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या अस्मानी पाठोपाठ सुलतानी संकटामुळे पुरता आर्थिक व मानसिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. सध्या बाजारात कांद्यासह सर्वच शेतीमालास रूपया दोन रुपयांच्या वर भाव मिळत नाही. अशा भावात उत्पादन खर्चतर सोडाच मात्र, शेतातून बाजार समिती पर्यंत वाहतुकीचा खर्चही शेतकर्यांच्या हातात पडत नाही. त्यामुळे शेतकर्यांना सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. त्यामुळे सध्या शेतकरी टोमॅटोची तोडणी न करताच माल शेतातच पडून देत आहे. तर काही शेतकरी टोमॅटो तोडून उकिरड्यावर व जनावरांना खायला घालत आहे. हजारो रुपये खर्च करुन उभे केलेली पीक डोळ्यासमोर फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. बाजार भाव मिळेल या आशेने उन्हाळयात भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जातात. मात्र यंदा टोमॅटो या सारख्या भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकट सापडला आहे. टोमॅटोला चार-पाच रुपये किलो दराने विकला जात असल्याने शेतकर्याचा केलेला खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात मुख्यता, टोमॅटो, मिरची ,सर्वच भाजीपाला पिकात अग्रेसर असून उत्कृष्ट प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो. लहान मुलासारखे जपलेल्या टोमॅटो पिकाला डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना शेतकरी हतबल झाल्याचे बघावयास मिळत आहे. टोमॅटो, पिकाचे बहुतांश शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते यंदा शुद्ध तालुक्यातील बहुतांश भागात टोमॅटो पीक लागवड केली असून हा नाशिक, मालेगाव, जळगाव, गुजरात अशा विविध ठिकाणी पाठवली जाते. अधिच अस्मानी सुलतानी अवकाळी संकटांचा सामना करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जातात. टोमॅटो भाजीपाला पिकासाठी लाखो रुपये खर्च करून उत्पन्न घेतले मात्र आज भाजीपाला फेकण्याची वेळ शेतकर्यावर आली आहे. टोमॅटो प्रति किलो चार पाच रुपये असल्याने काहीच मिळत नाही. त्यात काढणीचा खर्च गाडी भाडे सुद्धा निघत नसल्यामुळे बळीराजा तूर्ताच हवालदिल झाला आहे.
COMMENTS