Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये अखंडित वीजपुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक

महावितरणच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नागरिक हे विजेच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड देत आहेत. राष्ट्रवादी

रोहित पवार – राम शिंदेंना झटका… कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
व्हिडिओ काढत असल्याचा संशयावरून सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून खून 
पत्रकारांचे प्रश्‍न सरकारने तातडीने मार्गी लावावे

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नागरिक हे विजेच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकर्‍यांना शेतीसाठी पूर्ण दाबाने व अखंडित वीज पुरवठा व्हावा यासोबतच भारनियमन करण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते. मात्र महावितरण याबाबत कोणतेही ठोस पावले उचलत नसल्याने शेतकरी नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होवून कर्जत येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वीज पंपांना नियमित पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा, शेतीपंपाचे जळालेले रोहित्र विना विलंब बदलून मिळावेत, सिंगल फेजची मंजूर असूनही रखडलेली कामे पूर्ण व्हावीत यासोबतच मंजूर असलेली दिघोळ, चौंडी आणि चिलवडी येथील नवीन विज उपकेंद्राची आणि राशीन, मिरजगाव, भांबोरा, खांडवी आणि कुळधरण येथील उपकेंद्राची क्षमता वाढवण्याची कामे लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. या प्रमुख मागण्यांसह हे आमरण उपोषण बुधवारी सुरू झाले आहे. या प्रमुख मागण्यांबरोबरच सध्याचा दुष्काळ लक्षात घेता शेतकर्‍यांना वीज बिलाची आकारणी होऊ नये, दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी, कष्टकरी यांना उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी भारनियमन करण्यात येऊ नये, याबरोबरच शेतीपंपाचे कोटेशन भरलेल्या शेतकर्‍यांना वीज कनेक्शन व मंजूर रोहित्र त्वरित बसून द्यावे यादेखील मागण्या उपोषणकर्त्यांतर्फे करण्यात आल्या आहेत. या मागण्या तात्काळ स्वरूपात मान्य कराव्यात अन्यथा उपोषण आणखी तीव्र करण्यात येईल याची प्रशासनासह सरकारने दखल घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कर्जत जामखेडचे नागरीक व शेतकरी यांनी केले आहे. एकीकडे समाधानकारक पाऊस नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी हा विजेच्या समस्यामुळे आहे त्या पाण्यातही शेती पिकाचे सुयोग्य नियोजन करू शकत नाही.  त्यातच महावितरणला वेळोवेळी विनंती करूनही त्यांच्यातर्फे कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आमरण उपोषणाचा पर्याय निवडला असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत आणि यावर तोडगा निघेपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली आहे.

COMMENTS