सोनई : मडकी ता. नेवासा येथील थोरात वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी मच्छिंद्र मुरलीधर थोरात हे गंभीर जखमी झाले. यावेळी नेवासाचे आ. विठ
सोनई : मडकी ता. नेवासा येथील थोरात वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी मच्छिंद्र मुरलीधर थोरात हे गंभीर जखमी झाले. यावेळी नेवासाचे आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी यांनी भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली.जखमी शेतकऱ्याला धीर देत बिबट्याला जेरबंद करण्याचा वनविभागाला दिला आदेश.
बुधवारी दि.16 रोजी मडकी येथील शेतकरी मच्छिंद्र मुरलीधर थोरात हे सकाळी आपल्या उसाच्या शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे दबी धरून बसलेल्या बिबट्याने थोरात यांच्यावर झडप घातली. त्यांच्या दंडावर पंजा मारल्याने 30 टाके पडले असून कंबरेवर देखील पाच ते सहा टाके पडले आहेत. यामुळे परिसरात अत्यंत घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकरी रात्री शेतात पाणी भरण्यास जात नाहीत. तसेच शाळेतील मुलांना पण एकटे पाठवत नाहीत.
COMMENTS