Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाव गावात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील नाव गावातील यशवंत भागूजी बल्लाळ (वय 42) हे शेतात गेले असता अचानक गव्याने हल्ला केला. यामध्ये बल्लाळ हे गंभीर जखमी

वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांवर बिबट्याचा हल्ला
तिप्पट पैशाचे आमिष दाखवून मसूरच्या युवकांची 42 लाख रुपयांची फसवणूक
जिवदान देणार्‍या दूताचा हृदय विकाराने मृत्यू; कावडी गावच्या माजी सरपंचाबाबतची हृदयद्रावक घटना

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील नाव गावातील यशवंत भागूजी बल्लाळ (वय 42) हे शेतात गेले असता अचानक गव्याने हल्ला केला. यामध्ये बल्लाळ हे गंभीर जखमी झाले असून हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर पुढील उपचारासाठी कराडला हलविण्यात आहे. याबाबत स्थानिकानी दिलेल्या माहितीनुसार नाव येथील यशवंत बल्लाळ हे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेतात असताना अचानकपणे गव्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बल्लाळ यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्या आहेत. हल्ल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचुन जखमी पेशंटला प्राथमिक आरोग्य केंद्र हेळवाक उपचारासाठी आणले असता डॉक्टरानी प्राथमिक उपचार केलेनंतर पुढील उपचार कृष्णा हॉस्पिटल कराड येथे सुरू आहेत.
कोयना भागात गव्याचा हल्ला होण्याची मालिका सुरूच असून दोन दिवसापूर्वीच ढाणकल, ता. पाटण गावातील गव्याच्या हल्ल्यात एकाचा बळी गेला होता. सततच्या वनप्राण्यांच्या हल्ल्यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.

COMMENTS