देवळाली प्रवरा ः अनेक वर्षापासून शेतीसाठी वीज कनेक्शनची मागणी करुन ही मिळत नसल्याने मानोरी येथील तरुण शेतकरी दीपक आढाव याने देवळाली प्रवरा येथिल
देवळाली प्रवरा ः अनेक वर्षापासून शेतीसाठी वीज कनेक्शनची मागणी करुन ही मिळत नसल्याने मानोरी येथील तरुण शेतकरी दीपक आढाव याने देवळाली प्रवरा येथिल महावितरणाच्या उपविभागिय कार्यालयात सायंकाळी 5 वा. विष प्राशान करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महावितरण कार्यालयातील अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तरुणाचा जीव वाचला असून राहुरी पोलिस ठाण्यात राञी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,राहुरी तालुक्यातील मानोरी येथिल तरुण शेतकरी दिपक आढाव यांनी महावितरण कार्यालयाकडे अनेक वर्षा पासुन शेतीसाठी वीज कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज दाखल केलेला असताना अनेक वेळा मागणी करुन हि विज कनेक्शन दिले जात नसल्याने मंगळवार दि.6 रोजी सायंकाळी 5 वा. दिपक आढाव हे देवळाली प्रवरा येथिल महावितरणाच्या उपविभागिय कार्यालयात आले.शेतीच्या विज कनेक्शन बाबत चौकशी केली. परंतू मागचे पाढे पंचावन्न प्रमाणे सध्या विज कनेक्शन देता नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले. मागणी करुनही विज कनेक्शन मिळत नसल्याने संतप्त झालेल्या तरुण शेतकरी आढाव याने खिशातील विषारी औषधाची बाटली काढुन महावितरणाच्या अधिकार्यांसमोर विषारी औषध पेवून आत्महत्याच करतो असे म्हणून विषाची बाटली तोंडाला लावली असताना महावितरण कर्मचारी व पोलिस गिते यांनी हस्तक्षेप करुन विषाची बाटली आढाव यांच्या तोंडा पासुन ओढुन घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिस कर्मचारी गिते यांच्या फिर्यादी वरुन राञी उशिरा पर्यंत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.
COMMENTS