कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने केली आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने केली आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील भोसे गावातील शेतकरी आसाराम नानाभाऊ टेमकर (वय 60) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेतल्याने त्यांचा उ

उपजिल्हा रुग्णालय व व्यापारी संकुल कामाची आमदार काळेंकडून पाहणी
नितीन गडकरी व शरद पवार येणार एकाच मंचावर.. ४ हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ
श्रीगोंद्यात सात जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील भोसे गावातील शेतकरी आसाराम नानाभाऊ टेमकर (वय 60) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेतल्याने त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आसाराम टेमकर यांनी सेवा संस्था व एका राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची त्यांना परतफेड करणे शक्य होत नव्हते. इतरही काही व्यक्तींकडून त्यांनी उसनवारीने पैसे घेतले होते. त्यांचाही तगादा वाढला होता. या सर्व आर्थिक अडचणीमुळे त्यांनी शुक्रवारी सात जानेवारीला शेतामध्ये विषारी औषध घेतले. याची माहिती समजताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान सोमवारी (10 जानेवारीला) त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी मेडिकल ऑफीसरच्या अहवालावरून सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पाथर्डी पोलिस करीत आहे.

COMMENTS