Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘रंग माझा वेगळा’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

मुंबई प्रतिनिधी - स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले. टीआरपीच्या स्पर्धेत नेहमी अव्वल क्रमांकावर ठर

महाराष्ट्र दिनी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धे’चे आयोजन करणार : उपमुख्यमंत्री पवार
२९ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी जनता नागरी सहकारी पतसंस्थेवर गुन्हा दाखल
मुलींच्या दोन गटात झालेल्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल | LOK News 24


मुंबई प्रतिनिधी – स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले. टीआरपीच्या स्पर्धेत नेहमी अव्वल क्रमांकावर ठरणारी मालिका आहे. मालिकेतील दीपा-कार्तिकच्या लव्ह स्टोरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. मालिकेचा शेवटचा भाग आज शूट होत आहे. कलाकारांनी मालिकेचे काही फोटो सोशल मीडियावर टाकून जुन्या आठवणींना उजाला दिला आहे ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत काही दिवसांपासून कार्तिक दीपाचा सूड उगवताना दिसत आहे. दीपाला त्रास देण्यासाठी आयशादेखील त्याला मदत करते. पण आता आयशाची स्मृती परत येण्यासाठी कार्तिक आणि दीपा खास प्लॅन करणार आहेत. मालिकेच्या आगामी भागात आयशाची स्मृती परत येणार असून ती तिची चूक मान्य करणार आहे. त्यानंतर आता कार्तिक आणि दीपाच्या सुखी संसाराला सुरुवात होणार आहे. ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत.

COMMENTS