Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाईजान सलमान खानला शुभेच्छा देण्यासाठी चाहता निघाला सायकलवर

अहिल्यानगर : येथील सिद्धार्थ नगर मधील विजय पात्रे या सिनेअभिनेता सलमान खानच्या चाहत्याने भाईजान च्या 27 डिसेंबरच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त नगर ते मुंबई सायकलवरून निघाला आहे,त्याला काल आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या,यावेळी मयूर बांगरे उर्फ बालिश शेठ व युवक उपस्थित होते

नगरपालिका शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन
बैलाने मारल्याने ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू
बेरोजगार तरुणानं केला वडीलांचा खून; आई गंभीर जखमी l DAINIK LOKMNTHAN

अहिल्यानगर : येथील सिद्धार्थ नगर मधील विजय पात्रे या सिनेअभिनेता सलमान खानच्या चाहत्याने भाईजान च्या 27 डिसेंबरच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त नगर ते मुंबई सायकलवरून निघाला आहे,त्याला काल आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या,यावेळी मयूर बांगरे उर्फ बालिश शेठ व युवक उपस्थित होते

     आमदार जगताप म्हणाले विजय पात्रेला सर्वजण सलमान खानच म्हणून ओळखतात,यापूर्वीही त्याने सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त नगर ते मुंबई पायी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या व आताही तो सायकलवर जाऊन शुभेच्छा देत आहे हे त्याचे कार्य कौतुकास्पद आहे,चाहता  असावा तर असा असे म्हणून ते म्हणाले की विजय हा अत्यंत कष्टकरी मुलगा असून रोज कष्टाचे काम करतो व मागील वेळेस  त्याची भेट भाईजान बरोबर झाली होती व यावेळेसही होईल अशी शुभेच्छा दिली. विजय पात्रे म्हणाला मी लहानपणापासूनच भाईचा चाहता असून त्याच्याबरोबर एकदा तरी मला अत्यंत छोटा रोल मिळावा अशी माझी इच्छा आहे. दरवर्षी मी नगरमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करतो. मागील वेळेस माझ्या पायी  प्रवासाला अनेक लोकांनी रस्त्यात शुभेच्छा दिल्या होत्या व कौतुक केले होते, भारतातून हजारो चाहते या दिवशी मुबईतील बांद्रा या ठिकाणी त्याच्या निवासस्थानी शुभेछया द्यायला येतात  

        सिनेअभिनेता  सलमान खान यांचा जन्म 27 डिसेंबर 1965 ला झाला असून अभिनेता, चित्रपट निर्माता आहे , ते  हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. तीन दशकांच्या कारकिर्दीत खान यांना चित्रपट निर्माता म्हणून दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अभिनेता म्हणून दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.  भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक म्हणून  त्याचा उल्लेख केला जातो .फोर्ब्सने 2015 आणि 2018 मध्ये जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत खानचा समावेश केला आहे, त्यानंतरच्या वर्षात तो सर्वोच्च मानांकित भारतीय होता.खानने10  वर्षांच्या वार्षिक सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटात काम केले आहे

COMMENTS