Homeताज्या बातम्यादेश

प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार मामुटी यांची छोटी बहिण अमीना यांचे निधन

साऊथचा सुपरस्टार म्हणून ज्यांची लोकप्रियता आहे त्या मामुटींचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही प्रचंड मोठा असल्याचे द

चक्क! रशियामधील बातम्या देणारं हे चॅनेल बंद करण्यात आलं | LokNews24
आग्रा किल्ला परिसरात शिवजयंतीला नाकारली परवानगी  
मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी !

साऊथचा सुपरस्टार म्हणून ज्यांची लोकप्रियता आहे त्या मामुटींचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही प्रचंड मोठा असल्याचे दिसून आले आहे. अशा या प्रसिद्ध अभिनेत्यावर आता दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मामुटी यांची छोटी बहिण अमीना यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय ७० वर्ष होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. अमीना या कंजिरापल्ली परयक्कल यांच्या परिवारातील दिवंगत पी एम सलीम यांच्या पत्नी होत्या. अमीना यांना नसीमा या नावानं देखील ओळखलं जात असे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे अमीना यांच्या पश्चात भाऊ बहिण इब्राहिम कुट्टी, जकारिया पानापराम्बिल, सौदा आणि शफीना असा परिवार आहे. अमीना यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटूंबावर मोठा आघात झाला आहे. याशिवाय मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नायक असलेल्या मामुटी यांना अनेकांनी दिलासा दिला आहे. कित्येक बड्या कलाकारांनी अमीना यांना आदरांजली वाहिली आहे.

COMMENTS