Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध गीतकार सय्यद गुलरेझ यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी - सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध लेखक सैयद गुलरेज यांचं निधन झालं आहे. 4 नोव्हेंबर रोजी लॉस एंजिल्स येथील

माजलगाव ते तेलगाव रस्ता ऊखळुन टाकून नविन रस्त्या ला सुरूवात
शासकीय अधिकार्‍यांनी सामाजिक भावनेने काम करावे
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस आक्रमक

मुंबई प्रतिनिधी – सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध लेखक सैयद गुलरेज यांचं निधन झालं आहे. 4 नोव्हेंबर रोजी लॉस एंजिल्स येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध कांदबरीकार आदिल रशीद यांचे ते पुत्र होते. सैयद गुलरेज यांच्या निधनाची बातमी कळताच इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं होतं. नुसरत फतेह अली खान, बप्पी लेहरी, विजू शाह, नौशाद अली, अनु मलिक, अभिषेक रे, गौरव दासगुप्ता सारख्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं होतं. तसंच अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी त्यांनी अनेक अल्बम देखील केले होते.

लेखन करण्याबरोबर ते अनेक सिनेमांच्या संहितेचंही काम करत होते. ‘अपार्टमेंट’, ‘जरा सी भूल-एक छोटी सी गलती’, ‘मियामी से न्यूयॉर्क’ सारख्या सिनेमांच्या संहिता त्यांनी लिहिल्या आहेत. गीतकार म्हणून नावारूपाला येत असताना त्यांनी सुरूवातीला जगमोहन मूंदडा यांच्या ‘कमला’ पासून सुरूवात केली होती. बप्पी लेहरी यांनी त्याला संगीत दिलं होतं. सलमा आगा आणि पंकज उधास यांनी ते गायलं होतं. त्याचप्रमाणे ‘विषकन्यास’, ‘जन्म कुंडली’, ‘आ देखें जरा’, ‘आलू चाट’, ‘विक्ट्री’ सारख्या सिनेमांसाठी त्यांनी काम केलं. ‘कुछ दिल से’ सारखं पुस्तक देखील त्यांनी लिहिलं.

COMMENTS