Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध कन्नड टीव्ही अभिनेता संपत जयराम याची आत्महत्या

साउथ फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेता जे राम संपत याने आत्महत्या केली आहे. अवघ्या 35व्या वर्षी त

कांबळे खून प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यांना शब्बासकी पत्र !
Sanjay Raut on IT Raid : अपना भी टाईम आयेगा… (Video)
मुंबईतील बेकरी हरित इंधनात रूपांतरित करण्यासाठी मुदतवाढ

साउथ फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेता जे राम संपत याने आत्महत्या केली आहे. अवघ्या 35व्या वर्षी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. जे राम संपतच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. संपतने मुख्यतः कन्नड टीव्ही इंडस्ट्रीत काम केले आहे. संपत जे. राम हा कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता होता. त्यांने नेलमंगळा येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्याच्या निधनावर कन्नड कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

‘अग्निसाक्षी’सारख्या सुपरहिट मालिकांमध्ये त्याने काम केले होते. याशिवाय ‘श्री बालाजी फोटो स्टुडिओ’ या चित्रपटातही त्याने काम केले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं समीक्षकांनीही कौतुक केले. चित्रपट दिग्दर्शक राजेश ध्रुव यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट लिहून अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले.अभिनेत्याच्या चाहत्यांनाही या बातमीने धक्का बसला आहे.

COMMENTS