हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपर मॉडेल जीजी हदीद संबंधित एक महत्वाची माहिती मिळत आहे. अभिनेत्रीने आणि तिच्या मैत्रिणीने अंमली पदार्थ बाळगल

हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपर मॉडेल जीजी हदीद संबंधित एक महत्वाची माहिती मिळत आहे. अभिनेत्रीने आणि तिच्या मैत्रिणीने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हदीदला काही दिवसांपूर्वी केमन बेटावर तिच्या मैत्रिणीसोबत अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, गिगी हदीदला ग्रँड केमन येथील ओवेन रॉबर्ट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिच्या मैत्रिण लीह मॅककार्थीसोबत उतरली, यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांना अभिनेत्रीच्या बॅगेत अंमली पदार्थ आढळून आले मीडिया रिपोर्ट्सनुसार, कस्टम अधिकाऱ्यांनी जीजीच्या सामानाची तपासणी केली असता, पोलिसांना कारवाईत काही अंमली पदार्थ सापडले. त्यानंतर जीजी हदीदसोबत तिच्या मैत्रिणीला देखील अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. जीजी हदीद आणि तिची मैत्रिण मॅककार्थी समरी कोर्टात हजर केल्यानंतर अधिकार्यांनी त्या दोघींनाही दोषी ठरवले. जीजी हदीद आणि तिची मैत्रिण मॅककार्थी यांनी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी प्रत्येकी १,००० डॉलर इतका दंड ठोठावला आणि यावेळी त्यांना जामिनावर देखील सोडण्यात आले
COMMENTS