वैद्यकीय प्रक्रियेदरम्यान 29 वर्षीय अभिनेत्री लुआना अँड्रेडचा दुर्दैवी मृत्यु झाला. लुआनाच्या निधनामुळे जगभरातील सेलिब्रिटींना मोठा धक्का बसलाय.क

वैद्यकीय प्रक्रियेदरम्यान 29 वर्षीय अभिनेत्री लुआना अँड्रेडचा दुर्दैवी मृत्यु झाला. लुआनाच्या निधनामुळे जगभरातील सेलिब्रिटींना मोठा धक्का बसलाय.कॉस्मेटिक प्रक्रियेदरम्यान झालेल्या अडचणींमुळे लुआनाला 4 वेळा हृदयविकाराचा झटका आला. यादरम्यान लुआनाला तिचा जीव गमवावा लागला. सॅन लुईस हॉस्पिटलमध्ये लिपोसक्शन शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची गाठ पडल्याने लुआना आंद्राडेचा मृत्यू झाला. कॉस्मेटिक ऑपरेशनदरम्यान, अँड्रेडला अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवु लागला. तिला अस्वस्थ वाटू लागले. आणि अशातच तिला हृदयविकाराचा झटका आल्याने चालू ऑपरेशन थांबवावे लागले. पहाटे 5:30 वाजता अँड्रेडने अखेरचा श्वास घेतला तिचे निधन झाले. लुआनाचा मृत्यु झाल्यानंतर हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले आहे की, “लुआनाला हृदयविकाराचा झटका आल्याने ऑपरेशन करण्यात अडथळा निर्माण झाला. पुढे तिच्या टेस्ट केल्यानंतर आम्हाला तिच्या फुफ्फुसात रक्ताच्या मोठ्या प्रमाणात गाठी तयार झाल्याचं आढळलं. तिला पुढे ICU मध्ये हलविण्यात आले अन् तिथे तिच्यावर औषधोपचार करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला”
COMMENTS