Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुटुंब जिव्हाळा आणि शैक्षणिक कळवळा हेच शिक्षकांचे तपोधन ः प्राचार्य अनारसे

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः आजच्या काळात कुटुंब ह विस्कळीत होत आहे. यासाठी विद्यार्थी हा युगाचा कर्ता आहे, त्याला शिक्षणाची आणि शिक्षकांची ओढ असली पाह

शासन निर्णयानुसार शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे 
भंडारदरा धरणाच्या सुरक्षा भिंतेवर दारु पिणार्‍यांचा उच्छाद
कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः आजच्या काळात कुटुंब ह विस्कळीत होत आहे. यासाठी विद्यार्थी हा युगाचा कर्ता आहे, त्याला शिक्षणाची आणि शिक्षकांची ओढ असली पाहिजे, विद्यार्थी हाच आपला राष्ट्रवारसा त्याला जपले पाहिजे, त्याच्यात सेवेचे  संस्कार रुजविणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी आत्मीक तळमळीने शिकविले पाहिजे, कारण कुटुंब जिव्हाळा आणि शैक्षणिक कळवळा हेच शिक्षकांचे खरे तपोधन आहे, तेच वाढविले पाहिजे असे मत माजी प्राचार्य शन्करराव अनारसे यांनी व्यक्त केले.
  येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थी गुणवत्ता सन्मान सोहळा आणि कुटुंबजिव्हाळा परिसंवाद कार्यक्रम बोरावकेनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी  अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अनारसे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके, माजी प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये, संस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनालीताई पैठणे, शिक्षिका अनिता चेडे, श्रद्धा बनकर आदी उपस्थित होते. विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून मान्यवर पाहुण्यांचे  सत्कार केले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यात चोविसावा आणि रयतेच्या स्व. एस.के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर व  संस्कार केंद्रात प्रथम क्रमांक यश संपादन केलेल्या साईराज दिनेश वाडणकर तसेच दिनेश वाडणकर, तेजश्री वाडणकर यांचा  मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरवचिन्ह, शाल,बुके, पुस्तके आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.प्राचार्य अनारसे यांनी आपला खडतर जीवनप्रवास सांगून कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर दादा पाटील आदिंच्या सहवास आठवणी सांगितल्या.कष्ट केले तर फळ निश्‍चित मिळते, फक्त श्रद्धा आणि सबुरी पाहिजे, प्राचार्य शेळके, प्राचार्य डॉ. गागरे, साहित्यिक डॉ.उपाध्ये यांचे जीवन आणि साहित्य आजच्या विद्यार्थी युवकांनी समजून घेतले तर त्यांना खरे शिक्षण कळेल असे सुचविले. विद्यार्थी साईराज वाडणकर याने आपल्या मनोगतातून विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सुखदेव सुकळे, शाळेतील सर्व शिक्षक, आईवडील यांच्यामुळे आपणास यश मिळाल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका सोनालीताई पैठणे, शिक्षिका अनिता चेडे, श्रद्धा बनकर, प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. गागरे व डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उपस्थित शिक्षक,वाडणकर परिवार यांचा शाल, पुस्तके देऊन सत्कार केले.डॉ.उपाध्ये यांनी रयतेची शाळा म्हणजे सेवेचे तीर्थक्षेत्र आहे. प्रामाणिक शिक्षक, गुणवान विद्यार्थी आणि समर्पित व्यवस्थापन मंडळ यामुळे ही शाळा प्रथम क्रमांकाची मराठी शाळा असल्याचे सांगितले. प्राचार्य शेळके यांनी वाडणकर परिवार, सुकळे परिवार,बुरकुले परिवार म्हणजे ज्ञान व परिश्रमाचे आदर्श कुटुंब आहेत. आज कुटुंबजिव्हाळा जपला तरच आपण मुलांना योग्य वळण लावतो, सुखदेव सुकळे यांचा आदर्श सर्वत्र झाला पाहिजे,असे मत व्यक्त करून साईराज वाडणकर याचा सत्कार केला.रेखा वाडणकर, बाळासाहेब बुरकुले, संजय बुरकुले, सुरेखा बुरकुले, संकेत बुरकुले यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर उज्ज्वला बुरकुले यांनी आभार मानले.

COMMENTS