अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील अनापवाडी येथील चालकाने रस्तालुट झाल्याचा बनाव करत 32 हजाराची रोकड चोरीला गेल्याचा दावा करीत राहुरी पोलिस ठाण्य
अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील अनापवाडी येथील चालकाने रस्तालुट झाल्याचा बनाव करत 32 हजाराची रोकड चोरीला गेल्याचा दावा करीत राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 तासात या गुन्ह्याचा उलगडा करीत फिर्यादीच आरोपी असल्याचा पर्दाफाश केला व आरोपीच्या मुसक्याही आवळल्या.
याबाबतची माहिती अशी की, राहुरी पोलिस ठाण्यात पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास नितीन भास्कर अंत्रे (वय 28, राहणार अनापवाडी) याने राहुरी ते अनापवाडी रोडवर कापुराई देवी फाटा येथून अंदाजे 1 किलोमीटर पुढे अनापवाडीचे दिशेने जात असताना गाडीच्या पाठीमागून पल्सर मोटारसायकलस्वार तिघांनी येवून गाडीस त्या,ची गाडी आडवी लावून जबरदस्तीने धारदार शस्त्राने जखमी करून व गाडीच्या खाली उतरवून मारहाण केली आणि खिशातील 32 हजार 230 रुपये रोख रक्कम, त्यात विविध दराच्या नोटा व आधार कार्डची कलर झेरॉक्स खिशातून काढून घेतले, अशी फिर्याद दिली.
गुन्हा दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या बारा तासात या गुन्ह्याचा उलगडा करीत या गुन्ह्यातील फिर्यादीच हा आरोपी असल्याचा पर्दाफाश केला आहे. या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, पोलिस हवालदार मनोहर गोसावी, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने, रोहिदास नवगिरे आदींनी ही कामगिरी केली आहे.
COMMENTS