यूजीसीकडून विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारानवी दिल्ली : देशभरातील बनावट विद्यापीठांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ने विद

यूजीसीकडून विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा
नवी दिल्ली : देशभरातील बनावट विद्यापीठांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ने विद्यार्थ्यांना आणि पालकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन वर्षांत, देशाच्या आठ राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या बनावट विद्यापीठांची संख्या आता 12 राज्यांपर्यंत पोहचली आहे, अशी माहिती यूजीसीने दिली आहे.
तसेच, बनावट विद्यापीठांची संख्या 20 वरून 32 वर पोहोचल्याची बाबही समोर आली आहे. यूजीसीने आपल्या इशार्यात स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांनी अशा बोगस संस्थांमध्ये प्रवेश घेणे टाळावे. विशेषत: बेंगळुरू (कर्नाटका) येथील ’ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी’ सारख्या बनावट संस्थांच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर बनावट विद्यापीठांची संपूर्ण यादी उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापूर्वी ती नक्की तपासण्याची सूचनाही देण्यात आली आहे. सर्वत्र आपल्या जाळ्यात अडकवणार्या अशा बनावट विद्यापीठांमुळे दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ लागली आहे. देशातील 32 बनावट विद्यापीठांपैकी 12 दिल्लीतील आहेत. काही तर यूजीसीच्या कार्यालयापासून केवळ काही मीटरच्या अंतरावर स्थित आहेत, जे अधिकच चिंतेचे कारण बनले आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या संस्थांच्या आकर्षक जाहिराती आणि आकर्षक शैक्षणिक ऑफर्सना फसवणूक मानून, अधिकृत यूजीसी यादीची तपासणी केल्याशिवाय कोणत्याही संस्थेशी करार करणे टाळावे, असा सल्ला यूजीसीने दिला आहे.

COMMENTS