Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात बनावट दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश

राज्य उत्पादन शुल्क विभागाने 38 लाखाची दारू केली जप्त

पुणे ः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे, पिंपरी विभागाचे पथकाने पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गा जवळ मामुडी गावाचे हद्दीत सापळा रचून गोवा राज्या

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
कालवा सल्लागार समिती बैठक तातडीने व्हावी ः स्नेहलता कोल्हे
कोरोना काळात उद्योगाचे अर्थचक्र सुरू राहावे – ठाकरे l DAINIK LOKMNTHAN

पुणे ः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे, पिंपरी विभागाचे पथकाने पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गा जवळ मामुडी गावाचे हद्दीत सापळा रचून गोवा राज्यात तयार झालेल्या बनावट देशी दारुच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा आयशर कंपनीचा दहा चाकी ट्रक (डीडी-01, आर-9205) हा पकडला होता. त्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारु मिळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने थेट गोवा राज्यात जाऊन बनावट देशी दारुच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आतापर्यंत 38 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांनी दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकास सुरुवातीला 23 जानेवारी रोजी मामुर्डी गावाचे हद्दीत जुना पुणे मुंबई मार्गावर सापळा रचल्यावर संबंधित अवैध दारुची वाहतूक करणारा ट्रक मिळून आला होता. सदर ट्रकची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंर्तगत गुन्हयातील गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारु रॉकेट संत्रा 90 मिली क्षमतेच्या 60 हजार बाटल्या (600 बॉक्स) मिळून आले. सदर मुद्देमालात बनावट देशी मद्याचा एकूण 21 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल व दहाचाकी ट्रक असा एकूण 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर पुढील तपास करण्यात आला. त्यावेळी सदर जप्त बनावट देशी मद्य हे गोवा राज्यातील वडावल याठिकाणी एका पत्र्याच्या गोदामात तयार केले जात असून, त्याची विक्री महाराष्ट्र राज्यात केली जात असल्याची माहिती तपास पथकास मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गोवा याठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेऊन वडावल, ता. डिचोली, गोवा येथे बनावट देशी मद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा घालण्यात आला. यावेळी बनावट देशी मद्य तयार करण्यासाठी लागणारा 1 लाख 34 हजार रुपये किंमतीचा दारुबंदी गुन्हयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान झुल्फिकार ताज अली चौदरी (वय-68, रा.गाझियाबाद, उत्तरप्रदेश) व अमित ठाकूर आहेर (30, रा. पारसवाडा, ता. तालसरी, पालघर) या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई), 81, 83, 90, 103, 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, 5 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

COMMENTS