पालघर ः पालघर जिल्ह्यातील बनावट जिरे निर्मिती कारखाना पोलिसांनी सील केला आहे. रसायने वापरून तयार केल्या जात असलेल्या बनावट जिर्यामुळे नागरिकांचे
पालघर ः पालघर जिल्ह्यातील बनावट जिरे निर्मिती कारखाना पोलिसांनी सील केला आहे. रसायने वापरून तयार केल्या जात असलेल्या बनावट जिर्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आतापर्यंत बनावट जिर्याची किती विक्री झाली आणि किती लोकांच्या आरोग्याशी खेळ झाला, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. पालघर मधील नंडोरे येथील हा बनावट कारखाना उघडकीस आल्यामुळे त्याचे धागेदोरे थेट भिवंडीपासून गुजरातमधील उंजापर्यंत पोहोचले आहेत. हे बनावट जिरे जिरा राईस करण्यासाठी वापरले जाते. मोठ्या हॉटेलमध्ये पॅरोट कंपनीच्या या जिर्याचा वापर केला जातो. बाजारात साडेचारशे रुपये किलो दराने विकल्या जात असलेल्या मूळ जिर्यापेक्षा हे बनावट जिरे अडीचशे ते तीनशे रुपये किलो इतक्या कमी दराने विकले जात होते. त्यामुळे व्यावसायिकांची या बनावट जिर्यांना पसंती होती
COMMENTS