Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्रालयात फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड

मुंबई ः राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न

देवळाली प्रवरात पर्यावरण पूरक गणेश विसर्जन
समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा
युक्रेनच्या गृहमंत्र्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

मुंबई ः राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. एका महिलेने हा तोडफोडीचा प्रयत्न केला. दरवाजावरील नावाची पाटी तोडून तिने घोषणाबाजीही केल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पास न घेताच मंत्रालयात प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर ती थेट फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली आणि तिने तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मंंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचा ऐरणीवर आला आहे. तोडफोड करणारी व्यक्ती ही एक महिला असल्याचे एका व्हिडिओतून समोर आले आहे. मात्र, ती नेमकी कोण होती आणि ते हे कृत्य का केले, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला आहे. मंत्रालयातील या घटनेवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर अशा प्रकारे तोडफोड होत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेतच इतकी मोठी हेळसांड होत असेल तर सरकार म्हणून आपण काय करतोय? मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सर्व प्रकारची आधुनिक सुरक्षा आहे. ती भेदून कुणी मंत्रालयात प्रवेश करून तोडफोड करत असेल तर ही चिंतेची बाब आहे. गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर ते राज्यातील महिलांना काय सुरक्षा देणार? असा प्रश्‍नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व प्रवीण दरेकर यांनीही या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. तपासातून सत्य पुढे येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महिलेची ओळख पटली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड करणार्‍या महिलेची ओळख पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही महिला सत्ताधारी भाजपचीच कार्यकर्ती आहे. तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही महिला मनोरुग्ण असल्याचा दावाही केला जात आहे.

COMMENTS