राज्यात कायद्याचे नव्हे, ‘काय ते द्या’चे राज्य : फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात कायद्याचे नव्हे, ‘काय ते द्या’चे राज्य : फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे. शेतकर्‍यांच्या वाटेला काहीच येत नाही. तसेच सध्याचे हे सरकार म्हणजे कायद्याचे राज्य नसून काय ते द्या

पंतप्रधान मोदी करणार 7500 कोटींच्या प्रकल्पांचे उद्धाटन
कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रात मोठे योगदान ; डॉ. राऊत
राज्यातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत

मुंबई : राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे. शेतकर्‍यांच्या वाटेला काहीच येत नाही. तसेच सध्याचे हे सरकार म्हणजे कायद्याचे राज्य नसून काय ते द्या.. फक्त घेण्याचे, वसुली करण्याचे राज्य चालवत आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी जोरदार हल्लाबोल चढवला.
अमरावती, नांदेड आणि मालेगावातील हिंसाचार, राज्यात सामुहिक बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणार्‍या हत्या, वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालं आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध ठेवले जात आहे. आज जिल्ह्या जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदारांचं अवैध रेती, अवैध दारूचं नेक्सस सुरु आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशी अवस्था कधीही पाहिली नव्हती. या सरकारमध्ये कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे’चे राज्य आहे. राज्यात सत्ताधार्‍यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकर्‍यांकडे मात्र कुणीही पाहायला तयार नाही. एका मुलीवर 400 लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करु. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली.
नांदेड, अमरावती, मालेगावात घडलेली घटना साधी मानू नका. हा एक प्रयोग आहे. देशात अराजक निर्माण करण्यासाठी, केंद्र सरकारविरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे. 26 ऑक्टोबरला बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होतात. त्याचा निषेध म्हणून त्रिपुरात मोर्चा निघतो. 28 ऑक्टोबरला सोशल मीडियावर पोस्ट पसरवल्या जातात. तेव्हा मशिदीचा फोटो टाकला जातो. दिल्लीतील एका रेफ्युजी कँपला लागलेल्या आगीचा फोटो दाखवून त्रिपुरात कुराण जाळण्यात आल्याचे सांगितले जाते. जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून हिंदू मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला जातो. दु:खद बाब ही की देशाचे एक मोठे नेते राहुल गांधी यांना सर्व माहिती असूनही 8 नोव्हेंबरला ते ट्विट करतात की, त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार होतोय. लगेच 11 नोव्हेंबरला नांदेड, अमरावती, मालेगावात मुस्लिमांचे मोठे मोर्चे निघतात. एकाच वेळी वेगवेगळ्या शहरात हे कसे घडू शकते. हे सर्व राज्य सरकारच्या समर्थनातून निघालेले मोर्चे आहेत, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला.

मालेगावची घटना हा प्रयोग
मालेगावमध्ये झालेली हिंसा हा एक प्रयोग होता. देशात अराजक निर्माण करून आणि मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयोग होता, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हिंदूंची दुकाने निवडून निवडून जाळली जातात, एक तरी महाविकास आघाडीचा नेता त्यावर बोलला का? दुकान हिंदूचे असो की मुस्लिमांचे ते जाळणे चुकीचे आहे. पण एक तरी नेता बोलला का? असा सवाल फडणवीसांनी केला.

COMMENTS