Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीस-उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून सभागृहात

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरूवापासून सुरुवात झाली. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राज्याच्या राजकारणात एक वेगळे चित्र प

LOK News 24 I जुन्या नव्या पाण्याच्या टाकी संदर्भात चुकीची माहिती देऊन विपर्यास
राज्यातील महिला अत्याचाराचा महिला दिनीच वाचला पाढा
मोफत वधू-वर ग्रुपची आज खरी गरज ः मीनाताई जगताप

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरूवापासून सुरुवात झाली. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राज्याच्या राजकारणात एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट झाली. एवढेच नव्हेतर दोघेही एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. यादरम्यान फडणवीस आणि ठाकरे यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली? असा अनेकांना प्रश्‍न पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झाले. मात्र, त्याच वेळी उद्धव ठाकरेही तिथे पोहोचले. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून ही भेट योगायोगाने झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. पण यावरून अनेकांना ते एक गाणं आठवले असेल ना ना करते प्यार…, पण असे काही होणार नाही. ही भेट फक्त एक योगायोग आहे. भिंतीला कान असतात, असे म्हणतात. मात्र, लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. आम्ही या पुढच्या आमच्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू, असे उद्धव ठाकरे हसत म्हणाले.

COMMENTS