Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मला संपवण्याचा फडणवीसांचा डाव

मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असून, राज्यसरकारने मराठा समाजाला कायदेशीर आरक्षणासाठी विधिमंडळात विधेयक मंजूर केले आहे. मात्र मराठा समाजाला

मनोज जरांगे बॅकफूटवर ; शिंदे, फडणवीसांची मागितली माफी
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली
मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असून, राज्यसरकारने मराठा समाजाला कायदेशीर आरक्षणासाठी विधिमंडळात विधेयक मंजूर केले आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवे आणि त्यात सगे-सोयर्‍यांचा समावेश करण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा लढा तीव्र केला आहे. रविवारी अंतरावाली सराटी येथे माध्यमांशी बोलतांना जरांगे यांनी मराठा समाजाला संपविण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासोबतच मला देखील संपवण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.  बैठक संपल्यावर सागर बंगल्यावर पायी येणार, संपवून दाखवा असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करतांना म्हटले आहे की, फडणवीस यांच्यामुहे अनेकांनी भाजप सोडला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना फोडण्याचे कामफडणवीसांनी केले आहे. हे राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीतर देवेंद्र फडणवीस चालवत आहे. फडणवीसांना माझे उपोषण सोडवायला यायचे होते, पण त्यांना येऊ दिले नाही, तर अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याने फडणवीसांचा आपल्यावर राग आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यावर अजय बारस्कर यांनी देखील गंभीर आरोप करतांना म्हटले आहे की, जरांगे यांच्या पाहुण्यांकडे वाळू काढायच्या इतक्या डंपर गाड्या कशा आल्या, रातोरात इतका पैसा कसा आला, वाळूचा धंदा चालतो, असा गंभीर आरोप केला आहे. जरांगे यांनी संभाजीराजेंच्या नावाखाली पैसे खाल्ले, त्यांच्यावर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, असा दावा अजय बारसकर यांनी केला. असे अनेक गंभीर आरोप अजय बारसर यांनी केले आहेत. अजय बारसकर एवढ्यावरच थांबले नाहीत. ते आणखी माध्यमांसमोर जरांगेंच्या विरोधात पुरावे सादर करणार आहेत. यासाठी ते सोमवारी पुन्हा 11 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  तसेच पत्रकार परिषद घेणारी लोकं देखील उद्या वेगळी असतील असे बारसकर म्हणाले आहेत. मी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि इतर चाचण्यांना सामोरे जायला तयार आहे. तुम्ही पारदर्शक असल्याचे म्हणतायत तर माझ्यासहीत तुम्हीही या चाचण्यांना समोर या. सोमवारी 11 वाजता इथे बॉम्ब फुटणार आहे. उद्या 11 वाजता या. मी खुलासा करेन. असा इशाराच बारसकर यांनी मनोज जरागेंना दिला आहे.

सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न – मनोज जरांगे यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच देवेंद्र फडणवीस माझे एन्काऊंटर करण्याचा विचार करत आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत.

आरोपांची चौकशी व्हावी ः वडेट्टीवार – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर दोन समाजामध्ये विभाजन करण्याचं पाप या सरकारने केले अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. याविषयी बोलतांना वडेट्टीवावर म्हणाले, मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत असतील तर त्यामागची पार्श्‍वभूमी आम्हाला माहित नाही कारण आम्ही त्यात नाहीत. पण असे काही होत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

COMMENTS