फडणवीसांची आक्रमकता अन् विरोधकांची हतबलता!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांची आक्रमकता अन् विरोधकांची हतबलता!

 महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप संदर्भात वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थखाते सोपविले जा

रिलायन्सची चलाखी !
दुसऱ्या फेरीचे मतदान आणि काॅंग्रेस मॅन्युफॅस्टो ! 
मनुवादी पवार ते पेरियारवादी स्टॅलिन : एक फरक ! 

 महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप संदर्भात वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थखाते सोपविले जाईल, असा अंदाज महाराष्ट्रातील सर्वच धुरीणांनी व्यक्त केला असला तरी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अंदाज सपशेल चुकतील असे म्हटले आहे. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या आक्रमक शैलीतून विरोधकांची हवा काढली. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने टीका करणाऱ्यांना त्यांनी एकाच वाक्यात गप्प केले; ते म्हणाले की, ‘ज्यांचे दोन मंत्री कारागृहात आहेत, त्यांनी फार बोलू नये’, अशा शब्दांत सुनावत विरोधकांची हवा काढली. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी केलेल्या टिकेवरही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे उत्तर तर दिलेच, पण मुळ शिवसेनेचा त्यांनी उल्लेखही केला नाही. पवार म्हणाले होते की, भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांना हळूहळू संपवतो. यावर बोलताना फडणवीस यांनी आमचे ११५ आमदार असतानाही आम्ही ५० आमदार असणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले.‌ कमी आमदारांच्या पक्षाला मुख्यमंत्री पद देऊनही मित्र पक्षांना संपवित असल्याच्या आरोपाचे त्यांनी तर्कनिष्ठ खंडण केले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या एकाच वाक्यात मोठा आशय व्यापला आहे. त्यांनी मित्रपक्ष म्हणून पन्नास आमदार असणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिल्याचे त्यांचे सांगणे म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला अनुल्लेखाने त्यांचें महत्व एका झटक्यात कमी करून टाकले आहे. फडणवीस यांचे राजकारण आता परिपक्व असून विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्याला ते पुरून उरतील. मंत्रीमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटाचे मंत्री बनलेल्या सर्वांनाच फडणवीस यांच्या रणनितीतूनच संधी मिळाली आहे. ज्या संजय राठोड यांच्यावर महाविकास आघाडीत मंत्री असताना राजीनामा देण्याची पाळी फडणवीस यांनी आणली होती; तेच फडणवीस आता राठोड यांच्या विरोधात बोलणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांची बोलती बंद करित आहेत. खरेतर, काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस यांना फक्त सत्ता लागते. कारण सत्तेत राहून त्यांना आयत मिळवण्याची संधी मिळते. याउलट फडणवीस यांचा खाक्या आहे. ते सत्तेत असो अथवा विरोधात आपल्या विरोधी बाकांवरच्या नेत्यांना ते अगदी चिडीचूप करून टाकतात. राजकारणात स्वच्छ चारित्र्याशिवाय अशी गर्जना शक्यच राहत नाही. शरद पवार यांचे राजकीय आयुष्य जेवढे आहे त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या फडणवीसांचा राजकीय दबदबा हा महाराष्ट्रात जाणवण्याइतपत मोठा आहे. महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना ते एकट्याने पुरून उरतात, यावरून त्यांच्या राजकीय शक्तीची कल्पना यावी. मंत्रीमंडळ विस्तारतून हे सरकार उर्वरित अडीच वर्षे काढून नेणार, असा आत्मविश्वास एकंदरीत फडणवीस यांच्या देहबोलीतून प्रकट होतो.देवेंद्र फडणवीस हे असे राजकीय व्यक्तिमत्त्व आहे की, ज्यांच्याकडे मुत्सद्दीपणा, संघटक कौशल्य, अभ्यासू वृत्ती, आक्रमक आणि तितकाच स्पष्ट आणि मिश्किल असा स्वभाव. पक्षाला यश मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करणे आणि तसे करून मिळवलेल्या यशानंतर पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश पाळण्याची शिस्त असा एकंदरीत गुणांचा समुच्चय असणारे महाराष्ट्रातील ते आजपर्यंतच्या राजकारणातील एकमेव व्यक्तिमत्त्व असल्याचे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती नाही. शिंदे गटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी त्यांच्या न्यायीक कक्षा लक्षात घेऊनच फडणवीस सत्ताकारण करित आहेत. त्यामुळे, येणाऱ्या काळात न्यायालयाने जो काही निर्णय देईल त्यावर आपली राजकीय दिशा काय राहील याचे त्यांनी व्यवस्थित नियोजन तयार करून ठेवले असेल, याचा त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट संकेत मिळतो. 

COMMENTS