Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’मित्रा’साठी सरकारी तिजोरीतून उधळपट्टी

शासनाच्या निर्णयावर विरोधक आक्रमक

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ’मित्रा’च्या नवीन कार्यालयावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापतांना दिसून येत

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात 2 लाख 76 हजार कोटींची गुंतवणूक
दांडिया आयोजकांनी रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ’मित्रा’च्या नवीन कार्यालयावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापतांना दिसून येत आहे. राज्य सरकारने ’मित्रा’ यांचे नवे कार्यालय मुंबईतील नरिमन पॉईंट भागात हलवण्यात येत आहे. या नवीन कार्यालयाचे दरमहा भाडे 21 लाख रूपये आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर टीकेची झोड उडवली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ’मित्रा’चे नवे कार्यालय मुंबईतील सर्वात महागड्या नरिमन पॉइंट भागात असलेल्या निर्मल भवनात स्थलांतरित करण्यात आले आहे. मित्राच्या नवीन कार्यालयाचे एकूण क्षेत्रफळ 7920 चौरस फूट आहे. या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकारने दरमहा 21,38,400 रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या कार्यालयाच्या भाड्यात 5 टक्केने वाढ केली जाणार आहे. यावरुन आता विरोधकांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकार महिन्याला तब्बल 21 लाख रुपये म्हणजे वर्षाला 2 कोटी 56 लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे. मंत्रालयासमोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडत असल्याचे कारण पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला.. अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच मित्रा संस्थेवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राची वर्णी लावली असून आता या मित्राला बसण्यासाठी कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून देऊन ऐसपैस कार्यालयही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी क्षेत्रात असलेल्या आपल्या मित्र परिवारातील लोकांवर सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 11 नोव्हेंबर 2022 रोजी एकनाथ शिंदे  देवेंद्र फडणवीस सरकारने मित्राची स्थापना केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ’मित्रा’चे अध्यक्ष आहेत, तर ठाण्यातील विकासक अजय आशर हे उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या आकडेवारीचे विश्‍लेषण करणे, त्यांच्यात समन्वय निर्माण करणे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनवर नेण्याबरोबरच प्रकल्पांवर काम करण्यासाठी ’मित्रा’ची स्थापना करण्यात आली. ’मित्रा’ यांचे पहिले कार्यालय 1200 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या नवीन प्रशासन इमारतीत होते. जुनी जागा कामासाठी अपुरी पडत असल्याने नवीन कार्यालयासाठी मित्राच्या वतीने शासनाकडे मागणी करण्यात आली होती.

COMMENTS