कोरोना रुग्णांकडून खासगी रुग्णालयांनी घेतलेले अतिरिक्त शुल्क रुग्णांना परत : राजेश टोपे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना रुग्णांकडून खासगी रुग्णालयांनी घेतलेले अतिरिक्त शुल्क रुग्णांना परत : राजेश टोपे

मुंबई, दि. 23 : कोरोना कालावधीत जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका तसेच राज्यस्तरावरही तक्रार नोंदविण्याची संकेतस्थळाच्या माध्यमातून सोय कर

नगरच्या चास शिवारात…विखुरलेला मृतदेह
शिपिंग, लॉजिस्टिक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर राहील
खुनाच्या गुन्हात जन्मठेप झालेले चौघे निर्दोष

मुंबई, दि. 23 : कोरोना कालावधीत जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका तसेच राज्यस्तरावरही तक्रार नोंदविण्याची संकेतस्थळाच्या माध्यमातून सोय करण्यात आली होती. या माध्यमातून नॉन एनपॅनेल्ड दवाखान्याच्या सुमारे 63 हजार 889 तक्रारींपैकी 56 हजार 994 इतक्या तक्रारी सोडविण्यात आल्या आणि 35 कोटी 18 लाख 39 हजार रुपये परत करण्यात आले. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत असलेल्या एनपॅनेल्ड दवाखान्यांच्या 2 हजार 81 तक्रारींपैकी 774 तक्रारी सोडविण्यात आल्या आणि 1 कोटी 20 लाख रुपये परत करण्यात आले, असेही श्री. टोपे यांनी सांगितले. या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सदाशिव खोत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

COMMENTS