Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात क्रेडीट कार्ड काढून देण्याचे बहाण्याने चार लाखाचा गंडा

पुणे/प्रतिनिधी ः एका महिलेस क्रेडीट कार्ड काढून देते असे सांगून एका भामटया तरुणीने महिलेच्या कार्डची गोपनीय माहिती घेत, परस्पर ऑनलाइन सहा आयफोन ख

पाथर्डी तालुक्यात पावसाचा हाहाःकार
विषमतेत वाढ दर्शविणारा अहवाल, चिंताजनक!
भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना कॅन्सरचे निदान

पुणे/प्रतिनिधी ः एका महिलेस क्रेडीट कार्ड काढून देते असे सांगून एका भामटया तरुणीने महिलेच्या कार्डची गोपनीय माहिती घेत, परस्पर ऑनलाइन सहा आयफोन खरेदी करत एकूण तीन लाख 91 हजार रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
प्रतीक्षा अविनाश चौरे (रा.इंद्रायणीनगर, भोसरी,पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत संगिता हनुमंत गायकवाड (वय-46,रा.पर्वती,पुणे) यांनी पोलिसांकडे आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार सप्टेंबर 2021 ते ऑक्टोबर 2021 यादरम्यान घडलेला असून याबाबत तक्रारदार यांनी विलंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक्षा चौरे हिने तक्रारदार संगीता गायकवाड यांना आयडीएफसी बँकेचे क्रेटीड कार्ड काढून देते असे सुरुवातीला सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांना मोबाईलवर ओटीपी येईल असे सांगुन, सदर ओटीपी क्रमांक घेवून त्यांचे बँक खात्यातून वेळोवेळी दोन लाख 70 हजार रुपये किंमतीचे आयफोन मोबाईलचे लोन केले. तक्रारदार यांचे नावे चार आयफोन तरुणीने परस्पर खरेदी केली. तर तक्रारदार यांचा मित्र अक्षय गायकवाड यांचेकडून घेतलेल्या कागदपत्राचा वापर करुन अक्षय याचे नावे दोन आयफोन असा एकूण तीन लाख 91 हजार रुपयांचे लोन काढून फसवणुक केली आहे. याबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे पुढील तपास करत आहे. येवलेवाडी येथे राहणारे विशाल दिलीप कांबळे (वय-33) यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावर नोकरीसाठी मेसेज आले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे लोकेशन गुगल मॅपवर सर्च करायचे व त्याचे स्क्रीनशॉट त्यांचे मोबाईलवर पाठवण्याचे अशा स्वरुपाचा जॉब असल्याचे सांगुन, टास्कप्रमाणे वेळोवेळी कांबळे यांचेकडून एक लाख 30 हजार रुपये ऑनलाइन पध्दतीने घेवून, सदर पैसे परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

COMMENTS