मुंबई : आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता 12 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती विभागाच्या आयुक्त

मुंबई : आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता 12 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे. आदिवासी विकास विभागाने 5 ऑक्टोबर 2024 ला विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 नोव्हेंबर ठेवली होती. त्यास आता 12 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच 23 नोव्हेंबर 2023 रोजी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार अर्जाचे शुल्क विभागाने परत करण्यासाठी 28 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती. त्याला 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, जुना आग्रा रोड नाशिक येथे अथवा टोल फ्री 1800267 0007 या क्रमांकावर संपर्क साधावा.
COMMENTS