मुंबई/प्रतिनिधी ः नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट होत असून, गुरुवारी काँगे्रसने पक्षातून सत्यजित तांबे यांची हका
मुंबई/प्रतिनिधी ः नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट होत असून, गुरुवारी काँगे्रसने पक्षातून सत्यजित तांबे यांची हकालपट्टी केल्यामुळे तांबे आता भाजपची वाट धरणार का ?असा सवाल उपस्थित होत आहे. काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब केले असून, तांबे यांची पक्षातून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
आघाडीने नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि नागपूरमध्ये सुधाकर आडबालेंना पाठिंबा देण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करणार्या सत्यजित तांबेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आघाडीचे पाचही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. अपक्ष उमेदवाराने कोणाला पाठिंबा मागायचा आणि कोणाला मागायचा नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सत्यजित तांबेंना आता भाजप पाठिंबा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानपरिषद निवडणूक मविआ एकत्रपणे लढणार असल्याचेही यावेळी पटोलेंनी यावेळी स्पष्ट केले. तसेच दुसर्यांची घरे फोडण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचा आरोपही पटोलेंनी यावेळी केला.
भाजप पाठिंबा देणार का ? – महाविकास आघाडीने आपला उमेदवार घोषित केल्यामुळे आणि सत्यजित तांबे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे साहजिकच भाजप तांबे यांना पाठिंबा देणार असल्याची शक्यता आहे. कारण भाजपसमोर इतर उमेदवार देखील राहिलेले नाहीत. त्यामुळे भाजप तांबे यांना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतात की, तांबे भाजपमध्ये प्रवेश करतात, ते आगामी काही दिवसांत स्पष्ट होईलच. मात्र अद्याप भाजपची अधिकृत भूमिका देखील स्पष्ट झालेली नाही.
बाळासाहेब थोरात कोणत्या उमेदवाराचा प्रचार करणार ? – सत्यजित तांबे यांची काँगे्रसने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर तांबे यांचे मामा काँगे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांचा प्रचार करणार का, अ सा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून थोरात रुग्णालयात असून, ते उपचार घेत आहेत. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत तरी ते कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे एकंदरित चित्र आहे.
मविआचे पाचही उमेदवार निवडून येतील ः नाना पटोले – महाविकास आघाडीने गुरुवारी आपल्या पाचही उमेदवारांची नावे जाहीर केली असून, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, नाशिक पदवीधर मतदारसंघातून शुभांगी पाटील, कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघातून बाळाराम पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे गंगाधर नाकाडे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या काळात वाढलेली बेरोजगारी व महागाईच्या विरोधात जनतेमध्ये विशेषत: सुशिक्षित वर्गामध्ये असंतोष आहे. त्यांचं प्रतिबिंब या निवडणुकीत पडेल व महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.
COMMENTS