Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्यात शुल्क हटवून कांद्याला बाजारभाव मिळवून द्यावा ः आरोटे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली मागणी

श्रीरामपूर /प्रतिनिधी ः नाफेडचे भूत शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसवण्यापेक्षा केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवावे. जी कृत्रिमरित्या भाव पाडले गेले आ

अमृतवाहिनीतील 40 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड
बेलापूर-खंडाळा-अस्तगाव या रस्त्यांना निधी मंजूर करणार
विजेच्या धक्क्याने तरूण उद्योजकाचा मृत्यू

श्रीरामपूर /प्रतिनिधी ः नाफेडचे भूत शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसवण्यापेक्षा केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवावे. जी कृत्रिमरित्या भाव पाडले गेले आहे. ते निर्यात शुल्क हटवून कांद्याला बाजारभाव मिळवून द्यावा. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोलचेे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे व कांदा उत्पादक शेतकरी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, कांद्याला बाजारभाव मिळायला लागल्यामुळे सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करत कांद्याच्या निर्यातीवर निर्यात शुल्क 40% लावल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.बाजारपेठेत ,मार्केट मध्ये निर्यात शुल्क लावल्याने कांद्याचे भाव कमी झाले आहे. मुळातच शेतकरी अथवा शेतकरी संघटनांची कोणतीही मागणी नसताना केंद्र सरकारने नाफेडद्वारे कांदा खरेदी करण्याची शक्कल काढली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. जी मागणी नाही. ती केंद्र सरकारने लादल्याने शेतकरी व शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
    नाफेडद्वारे कांदा खरेदी म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशी अवस्था झाली आहे. नाफेडची निर्मिती मुळात वेगळ्या उद्देशाने झाली आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावल्याने कांद्याचे भाव पडले आहे. केंद्र सरकार फक्त शहरी भागात राहणार्‍या मतदारांचा विचार करून भाव पाडत असेल. तर खाणार्‍यांचाच विचार करत असेल तर, केंद्र सरकारने हा विचार करावा की, शेतकर्‍यांची मुल शिकली असून त्यांनाही अर्थशास्त्र कळत आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील मतदार सरकारने कायम दुय्यम स्थान दिले आहेत. त्यांच्या भावनांचा आदर सरकारने केला नाही, परंतु आता ग्रामीण भागातील मतदार आणि शेतकरी हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारने तातडीने निर्यात शुल्क हटवावे,कांद्याला किमान चार हजार रुपये भाव द्यावा, सरकारने जाहीर केलेले कांदा अनुदान तातडीने द्यावे,अश्या मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे, उपाध्यक्ष सुनील पुंडे,कार्याध्यक्ष सुरेश नवले, युवक अध्यक्ष शुभम आंबरे, सोमनाथ आहेर, पोपट आहेर, प्रवीण आहेर, संजय वाकचौरे, संतोष उगले( टेलर), कांदा उत्पादक शेतकरी यांनी केली आहे.
प्रतिक्रिया- केंद्र सरकारने तातडीने निर्यात शुल्क हटवावे. शहरी मतदारांचा विचार न करता शेतकर्‍यांचा आणि ग्रामीण भागातील मतदार यांचा विचार करावा.! अन्यथा इतिहासात कांदा खणार्‍यांनी सरकार पाडल्याचे उदाहरण आहे.आता कांदा उत्पादक शेतकरी हे सरकार पाडतील. -सुशांत  आरोटे,तालुकाध्यक्ष,अकोले,स्वाभिमानी शेतकरी संघटना.

COMMENTS