Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात आरक्षण प्रश्‍नांवर स्फोटक परिस्थिती

खा. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मंत्री भुजबळांचे वक्तव्य

मुंबई ः अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी खासदार शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भुज

अखेर राज्य सरकारला उपरती
फराह खान आणि साजिद खानने घेतले साईसमधीचे दर्शन 
चोखोबा ते तुकोबा या समतेच्या वारीचे पंढरपूर येथून देहूकडे प्रस्थान  

मुंबई ः अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी खासदार शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भुजबळ पुन्हा एकदा शरद पवार गटात येण्यास इच्छूक असल्याच्या चर्चा रंगत असतांनाच भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपण आरक्षणाच्या प्रश्‍नांवर पवारांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. आरक्षणाच्या प्रश्‍नांवरून राज्यातील परिस्थिती स्फोटक बनली असून, शरद पवारांनी यात लक्ष घालण्याची मागणी केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी बोलतांना भुजबख म्हणाले की, मी पवार साहेबांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. माझी ही नियोजित भेट नव्हती. सव्वादहा वाजता आतमध्ये गेलो. तेव्हा तब्बेत बरी नसल्याने ते झोपलेले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठले. त्यांनी मला बोलावले. ते बिछान्यावरच झोपलेले होते. त्यांच्या बाजूला मी खुर्ची ठेवून साधारणतः दीड तास आम्ही चर्चा केली. त्यांना मी सांगितले मी कोणतेही राजकारण, मंत्री म्हणून आलेलो नाही. कुठली पक्षीय भूमिका माझी नाही. पण हे महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही राबवले. आणि आता राज्यामध्ये आणि काही जिल्ह्यात फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले, राज्यात ओबीसींना आरक्षण देण्यासाठी शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही याबाबतीत तोडगा काढण्यासाठी तुमची जबाबदारी आहे. यावर शरद पवार यांनी याप्रकरणी चर्चेस तयार असून हा मुद्दा सोडवण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे, असे भुजबळांनी सांगितले.
दरम्यान, या भेटीपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना कल्पना दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मी केवळ निघताना प्रफुल्ल पटेल यांना कल्पना दिली होती. शरद पवार यांच्याशी मी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. संबंधित कागदपत्रे मी त्यांना देणार आहे असे मी त्यांना सांगितले. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनीही मला शरद पवारांची भेट घेण्याचा सल्ला दिला असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत खा. पवार बोलणार – यावेळी भुजबळ म्हणाले की, ओबीसी प्रश्‍नांवर मी पवार यांना कल्पना दिली आहे. माझ्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले, मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांच्यासोबतच्या भेटीत सरकारकडून काय आश्‍वासने देण्यात आली आम्हाला काहीच माहित नाही. त्यावर मी त्यांना म्हणालो मी तुम्हाला माहिती देतो. कुठे काय झाले. अधिवेशनात काय चर्चा झाली याबाबत मी शरद पवारांना सांगितले. तसेच शरद पवार हे येत्या 2 दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार चर्चेसाठी तयार आहेत. राज्यातील हा महत्वाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी शरद पवार यांचा सहभाग असावा हा माझा आग्रह आहे. राज्यात शांतता प्रस्थापित करणे हाच माझा हेतू असल्याचे स्पष्टीकरण देखील भुजबळांनी यावेळी दिले.

COMMENTS