Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण

ठाण्यामध्ये मांत्रिकांसह 7 जणांच्या टोळीला बेड्या

ठाणे ः पैशांचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून मुलींचे शोषण करण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मांत्रिक आणि

पुण्यातून बांगलादेशी तरुणीसह चौघींची सुटका
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 6 जुलैला होणार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी राज्यातील 110.39 लाख लाभार्थींना रक्कम रू. 23607.94 कोटी लाभ अदा

ठाणे ः पैशांचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून मुलींचे शोषण करण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मांत्रिक आणि त्याच्या सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. या टोळीत महिलेचाही समावेश असून गोरगरीब मुलींना लक्ष्य करून ही टोळी त्यांचे शोषण करत होते. ठाण्यात राबोडी येथील एका अल्पवयीन मुलीचे या टोळक्याने शोषण केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
आरोपींमध्ये असलम खान (वय 54), सलीम शेख (वय 45) मांत्रिक साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा (वय 61), तौसिफ शेख (वय 30), शबाना शेख (वय 45), शब्बीर शेख (वय 53) तसेच लालबाग, मुंबईतील हितेंद्र शेट्टे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या राबोडी पोलिस ठाण्यात 15 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एककडून करण्यात येत होता. युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलिस निरीक्षक विकास सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या पथकाने कसून तपास करत 17 फेब्रुवारीला राबोडीतील आधी तिघांना अटक केली. तर 27 फेब्रुवारीला मुंबईच्या अँटॉप हिल झोपडपट्टीतील मांत्रिक साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा याला अटक करण्यात आली. या टोळीने राज्यात तब्बल 17 मुलींचे या प्रकारे शोषण केल्याचे उघड झाले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही टोळी गोरगरीब पीडित मुलींना लक्ष्य करून त्यांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत होते. याचा व्हिडिओ देखील ते दाखवत होते. मुलींचा विश्‍वास बसावा या साठी महिलेचा आक्षेपार्ह स्थितीतील रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ मुलींना दाखवला जायचा. यामध्ये महिलेशेजारी पैशांचा ढीग पडलेला असायचा. दरम्यान, या प्रकारे जर पैसे मिळवायचे असेल तर विधी करण्यास सांगून मांत्रिक व त्याचे साथीदार मुलींना फसवायचे आणि यानंतर त्यांच्यावर अत्याचार केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

COMMENTS