शोषणमुक्त विवाह

Homeताज्या बातम्यासंपादकीय

शोषणमुक्त विवाह

भारतात आणि जगभरात काम करणारी विवाह पद्धती ही अपवाद सोडता विषमतावादावर आधारित आहे. विवाहसंस्थेतील व्यक्तिस्वातंत्र्याचे स्थान आणि वैवाहिक संबंधांचे स्

हलगर्जीपणा नको…
सीमाप्रश्‍नांतील राजकारण
काँगे्रसमध्ये पुन्हा दुफळीचे संकेत

भारतात आणि जगभरात काम करणारी विवाह पद्धती ही अपवाद सोडता विषमतावादावर आधारित आहे. विवाहसंस्थेतील व्यक्तिस्वातंत्र्याचे स्थान आणि वैवाहिक संबंधांचे स्वरूप याचा विचार केला तर पुरुष आणि स्त्री हे दोन्ही वर्ग जन्मापासूनच धर्मसंस्थेचे गुलाम असतात. भारतासह पाश्चत्य देशात अलीकडे या पारंपरिक गुलामीला लोक नाकारत आहेत ही बाब अभिनंदनीयच आहे. विवाहसंस्थेतील व्यक्तिस्वातंत्र्याचे स्थान आणि वैवाहिक संबंधांचे स्वरूप अशा दोन निकषांवर जगातील वैवाहिक संस्थांचे वर्गीकरण करावयाचे झाल्यास, एका टोकाला व्यक्तिस्वातंत्र्याचा संपूर्ण अभाव आहे आणि वैवाहिक संबंधांचे अतूट स्वरुप या निकषांवर आधारलेली परंपरागत हिंदू विवाहसंस्था; तर दुसऱ्या टोकाला संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी आणि वैवाहिक संबंधांचे स्वरूप पूर्ण ऐच्छिक असावे असा आग्रह धरणारी पाश्चात्य समाजात सध्या रूढ असलेली आधुनिक विवाहसंस्था, असा फरक आहे. विवाहसंस्थेचे सम्यक आकलन करणे क्रमप्राप्त. परंपरागत हिंदू विवाहसंस्थेचे व त्यानंतर आधुनिक विवाहसंस्थेचे विवेचन केल्यास आधुनिक विवाहसंस्थेचे परिणाम मानवी हिताचे आहे. तर परंपरागत विवाह संस्थेचे परिणाम हे शोषण, दमण, अन्याय, अत्याचार करणारे आहेत.
हिंदू विवाहसंस्थेची उत्क्रांती प्राचीन वैदिक काळापासून झाली. या उत्क्रांतीची विभागणी स्थूल मानाने प्राचीन वैदिक, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन कालखंडांत करता येते. भारतात ब्रिटिश राजवटीत आधुनिक पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे विवाहसंस्थेच्या मूळ स्वरूपाशी विसंगत असलेले काही बदल  घडून आले. हिंदू विवाहसंस्थेचे पारंपरिक स्वरूप व विवाहप्रकाराची आपण चिकित्सा केली तर हिंदू विवाहसंस्था प्राचीन इहवादी व पारलौकिक दृष्टिकोणांतून साकारली आहे. गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये पती व पत्नी या दोघांनी मिळून पाळावयाची असतात. पारंपरिक भारतीय समाजव्यवस्थेत एकविवाह (एक पत्नीकत्व) पद्धतीस वैदिक काळापासूनच एक आदर्श विवाहप्रकार म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. ऋग्वेदकाली पती पत्नीचे नाते ज्या प्रकारचे होते आणि कुटुंबसंस्थेतील आपसांतील संबंध ज्या प्रकारचे मानत असत, त्याचप्रकारचे पतीपत्नीचे नाते व कौटुंबिक संबंध वर्तमान काळापर्यंत भारतीय समाजात आदर्श मानले आहेत. विवाहसंस्थेमध्ये हुंड्याला आभासही दर्जा आहे. जे शोषण करणारा आहे. भारतीय दंडविधानात ३०४ ब हे नवे कलम घालण्यात आले. या कलमात ‘हुंडाबळी’ची व्याख्या आहे. जेव्हा एखाद्या विवाहितेचा मृत्यू भाजल्यामुळे वा शारीरिक इजेमुळे आणि असाधारण परिस्थितीत विवाहापासून सात वर्षांच्या आत झाला असेल तसेच मृत्यूपूर्वी तिचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे सिद्ध झाले तर तो मृत्यू ‘हुंडाबळी’ समजण्यात येतो. हुंडा विरोधी कायदा आपल्याकडे झाला पण हुंडा पद्धत आहे तशीच आहे. हुडा प्रतिबंधक कायदा, 1961 या अधिनियमातील कलम 2 अन्वये हुंडा या शब्दाची व्याख्या विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आई-वडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने किंवा तत्पूर्वी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा दयावयाचे कबुल केलेली कोणतीही संपती अथवा मुल्यवान रोख असा आहे. परंतू त्यामध्ये ज्या व्यक्तींना मुस्लिम व्यक्तिगत कायदा (शरीअत) लागू आहे त्या व्यक्तींच्याबाबतीत दहेज किंवा मेहर यांचा समावेश होत नाही. भारतात बालविवाह ही देखील मोठी समस्या आहे. वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. पण आपल्याकडे बालविवाह होतात. आधुनिक आणि पाशात्य विवाह पद्धतीमध्ये कायद्याला धरून जे विवाह होतात ते विषमतामुक्त विवाह आहेत. यात परंपरेला थारा नसल्याने हे विवाह शोषणमुक्त म्हणावे लागतील. 

COMMENTS