राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार

12 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याव्यतिरिक्त एकही मंत्री नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी ह

पर्यटकांनी फुलले पाचगणी, महाबळेश्‍वर
पदवीधर मतदार संघाच्या पाच जागेसाठी बाळासाहेबांची शिवसेना व भाजपच्या नेत्यांची  बैठक – मंत्री गुलाबराव पाटील 
लाडक्या शेवंताचा क्लासी अवतार | फिल्मी मसाला | LokNews24 |

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याव्यतिरिक्त एकही मंत्री नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्‍न सातत्याने विचारला जात होता. मंत्रिमंडळ विस्ताराअभावी विधीमंडळाचे अधिवेशन देखील रखडले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला असून, आज मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी सकाळी 11 वाजता राजभवनमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्रलंबित असल्यामुळे मिनी मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार असून, या मंत्रिमंडळात 12 ते 20 मंत्री शपथविधी घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून, त्यावेळी मंत्रिमंडळाचा असलेला 43 मंत्र्यांचा कोटा पूर्ण करण्यात येईल, असा निर्णय भाजपच्या वरिष्ठांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे आज मंत्रि आपल्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परतले असून, मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी जाऊन बैठक घेतली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली आहे. त्यादरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत त्यांच्यात झाल्याची माहिती मिळत आहे. नीती आयोगाची बैठक संपवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईत परतले त्यानंतर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटातील दीपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भरत गोगावले तसेच अपक्षांतून बच्चू कडू, राजेंद्र पाटील येड्रावकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.तर भाजपकडून चंद्रकातं पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्म विखे पाटील, बबनराव लोणीकर, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, नितेश राणे यांच्या नावांची चर्चा आहे.

17 ऑगस्टपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर 18 जुलैला राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. परंतु त्याचदिवशी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार होते. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलले. आता 17 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. विधान भवनात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या 3 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाची तारीख निश्‍चित करण्यात येऊ शकते. 17 ऑगस्टपासून अधिवेशन सुरु होईल. ते दोन आठवडे चालणार आहे. दिल्लीवारी करून आलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वेगाने हालचाली करण्यास सुरूवात केली आहे.

अधिकारी आणि कर्मचार्‍यांची रजा रद्द
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनदरम्यान रजेवर असणार्‍या सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडून याबाबत आदेश काढण्यात आला आहे. अधिवेशन सुरु असल्यामुळे या काळात विधिमंडळ सचिवालयांचे कार्यालय सुरु राहणार आहे. तसेच या कालावधीत सर्व कर्मचारी आणि अधिकार्‍यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

COMMENTS