Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार !

मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातील आमदार आग्रही

मुंबई प्रतिनिधी - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बर्‍याच दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र तो केवळ 18 मंत्र्यांचा. त्यामुळे मंत्रिमंडळाच

कोपरगाव शहरात विजेचा खेळखंडोबा
शिरूर येथे बापलेकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू,
अमेरिकेतून गांजा मागवणारे दोघे अटकेत

मुंबई प्रतिनिधी – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बर्‍याच दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र तो केवळ 18 मंत्र्यांचा. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा सवाल विचारला जात होता. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला असून, हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे.
काल गुरुवारी उशीरा रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तातडीची बैठक घेण्यात आल्याचे बोलले जात असून, या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 13 डिसेंबर 2022 ला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपासाठी सत्ताधारी आमदारांकडून दबाव आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्रिपदे वाटपाचा फॉर्म्युला आणि संभाव्य नावांच्या यादीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.  पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटातील मिळून एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता डिसेंबरमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ हे 9 ऑगस्ट 2022 ला स्थापन झाले. यात राज्याच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यात शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, विजयकुमार गवित, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

सत्ताधारी आमदारांचा दबाव वाढला – राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार त्वरित करावा यासाठी शिंदे गटाचे आमदार आग्रही आहेत. एकतर विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी हातात आहे. अशावेळी जर मंत्रिपद मिळाले नाही तर, विकासकामांना बाधा येईल, आणि विधानसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे निवडणुकांची घाई, यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मागणी या आमदारांकडून करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे मंत्रिमंडळात आमदारांना संधी न मिळाल्यास नाराजी वाढण्याची शक्यता देखील आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत चालला आहे. मात्र येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 

COMMENTS