Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदगीर येथे पीएनजीतर्फे दागिन्यांचे प्रदर्शन-विक्री सुरू

उदगीर प्रतिनिधी - विश्वसनीय सराफी ब्रँड पु. ना. गाडगीळ आणि सन्स अर्थात पीएनजी सन्स चाळीसगाव येथे दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री सुरू झाली असून, प

पत्नीचा गळा आवळून गुजरातला पळाला
राज्याचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांची आशियाना निवासस्थानी भेट
नुपूर शर्मा आणि देशातील बुद्धिजीवी !

उदगीर प्रतिनिधी – विश्वसनीय सराफी ब्रँड पु. ना. गाडगीळ आणि सन्स अर्थात पीएनजी सन्स चाळीसगाव येथे दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री सुरू झाली असून, प्रदर्शन शनिवारी व रविवारी 26 व 27 ऑगस्टदरम्यान सकाळी 11 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. पहिल्याच दिवशी उदगीरकरांनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनास शुक्रवारी सौ. चौधरी, सौ. विश्वनाथे, सौ. दंडवते, सौ. मुंढे, चित्रे यांच्यासह पीएनजी सन्सचे विक्री प्रमुख जितेंद्र जोशी, व्यवस्थापक हेमंतकुमार साई, अरुण कोरूळकर, शंतनू पाटील आदी उपस्थित होते. या संदर्भात विक्रीप्रमुख जितेंद्र जोशी म्हणाले, की ग्राहकांचा आग्रह, सण-उत्सवानिमित्त आम्ही उदगीर येथे दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री शुभंकर फंक्शन हॉल, दंडवते संकुल, कॅ. कृष्णकांत चौक, देगलूर रस्ता येथे भरविले आहे. प्रदर्शनात सोने-हिरे व विविध रत्नांचे दागिने तसेच, चांदीच्या वस्तू-दागिने आणि फॅन्सी ज्वेलरीच्या असंख्य व्हरायटी आहेत. या प्रदर्शनात पुणे, मुंबई येथील दालनांतून मिळणारे दागिने खरेदीची संधी असून त्यावर आकर्षक डिस्काउंट आहे. तसेच, प्रदर्शनास भेट देणा-यास विशेष डिस्काउंट कूपन भेट म्हणून मिळणार आहे. पीएनजी सन्स सेवा, विश्वास, सचोटी, गुणवत्ता व पारदर्शी व्यवहारासाठी महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असणारा सराफी ब्रँड आहे. अनेक हिंदी व मराठी चित्रपटांसाठी दागिने बनविले आहेत, असे जोशी यांनी सांगितले.

COMMENTS