Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्त विद्यापीठ कृषी शिक्षणक्रम पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ०१ ते १५ डिसेंबर

नाशिक (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषी शिक्षणक्रमाच्या प्रमाणपत्र व पदविका शिक्षणक्रमाच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचा तालुक्यात बोजवारा
चोरीस गेलेल्या पिकअपसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
शेवगांव तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर ; अनु .जाती १०,अनु.जमाती २, नामप्र २५ तर खुल्या वर्गासाठी ५७
Displaying परीक्षा भवन.jpg

नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषी शिक्षणक्रमाच्या प्रमाणपत्र व पदविका शिक्षणक्रमाच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा ही येत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये तर अंतिम लेखी परीक्षा मे/जून २०२६ मध्ये होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची मुदत येत्या सोमवार दिनांक ०१ ते १५ डिसेंबर २०२५ पर्यंत राहील. तसेच विलंब शुल्कासह दिनांक १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ व विशेष विलंब शुल्कासह दिनांक २२ ते २६ डिसेंबर २०२५ पर्यंत हा अर्ज भरता येईल.

विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने यासंदर्भात सुचनापत्रक जारी केले आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचा नोंदणी कालावधी संपलेला आहे, अशा कृषी प्रमाणपत्र व पदविका शिक्षणक्रमाच्या (कृषी पदवी वगळता) विद्यार्थ्यांनी प्रथम विहित पध्दतीने पुनर्नोदणी करणे अनिवार्य आहे. पुनर्नोदणीसाठी ०२५३ – २२३०१०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे. पुनर्नोदणीची प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच पुनर्परीक्षा अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा अर्ज व शुल्क भरायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने न भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला (http://ycmou.digitaluniversity.ac) भेट देऊन ‘Online Exam Form Submission for Repeater Student’ वर क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्याने आपला १६ अंकी नोंदणी क्रमांक (पीआरएन -PRN) नोंदवून अर्ज भरावा.

 तसेच, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये सर्व विद्यार्थ्यांना एबीसी आयडी (अकॅडमिक बँक ऑफ क्रेडीट) तयार करणे देखील अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो सादर केलेला नाही, त्यांचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी सर्व अद्ययावत माहिती व वेळापत्रकासाठी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी पहावे असे आवाहन परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.

COMMENTS