Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी आमदार मुरकुटे यांना जामीन मंजूर

देवळाली प्रवरा : बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी

पिण्यासाठी निळवंडे व पालखेड कालव्याचे पाणी द्या
अहमदनगर जिल्ह्यातील धरण क्षेत्राला जोरदार पावसाची प्रतीक्षा; गेल्यावर्षीपेक्षा सव्वादोनशे मिमी कमी पाऊस
24 वर्षांपासूनच्या थकीत बड्या 273 जणांवर पवारांची कृपा…भूविकास बँकेचे पावणे बारा कोटीचे कर्ज झाले माफ

देवळाली प्रवरा : बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी जामिन मंजूर केल्याने माजी आमदार मुरकुटे यांची विधानसभा मतदानापुर्वी सुटका झाली आहे. मुरकुटे यांचा जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता. पीडित महिलेच्या मुलीला छायाचित्रण करायला लावल्याचा आरोप मुरकुटे यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपानंतर ’पोक्सो’अंतर्गत गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले. त्यामुळे दिवाळी पाठोपाठ आता विधानसभा निवडणूक काळातही भानुदास मुरकुटे यांना कोठडीतच राहावे लागले. नगर जिल्ह्याच्या राजकारणात भानुदास मुरकुटे हे एक प्रभावी नाव आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले. गेल्या 30 वर्षांपासून अशोक सहकारी साखर कारखान्यावर त्यांचा एकहाती अंमल आहे. डिस्टिलरी असोसिएशन, बँकिंग क्षेत्रात त्यांनी राज्याच्या पातळीवर काम केले.उसाच्या आणि पाण्याच्या प्रश्‍नावर त्यांनी पश्‍चिमेकडील नेत्यांशी संघर्ष केला.फटकळ आणि हजार जबाबी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या महिन्यात राहुरी तालुक्यातील एका महिलेने त्यांच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली.संबंधित पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर 7 ऑक्टोबरला मुरकुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप मुरकुटे कुटुंबीयांकडून केला जात आहे. मात्र फिर्यादी महिलेने पुरावे पुढे केल्याने आरोपांना फारसा अर्थ उरत नाही.
दरम्यान महिलेने फिर्यादीत नमूद केलेल्या तथ्यांची पोलिसांनी पडताळणी केली. संबंधित फोटो, व्हिडिओ,प्रवासाची तिकिटे असे पुरावे ताब्यात घेतले. मुरकुटे यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही सहारे यांच्यासमोर जामीनासाठी अर्ज केला होता. परंतू मुरकुटे यांना जामीन फेटाळला गेला. मात्र पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीला बळजबरी छायाचित्रण करण्याला भाग पाडल्याचे सरकारी वकील अँड.उज्वला थोरात व अँड. नम्रता गर्जे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मुरकुटे यांच्या वतीने अँड. हर्षद निंबाळकर यांनी कामकाज पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अल्पवयीन मुलीचा मुद्दा ग्राह्य धरून मुरकुटे यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. मुरकुटे यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. अँड राहुल कर्पे यांच्या मार्फत जामिनसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती अरुण पेडणेकर यांनी अँड राहुल कर्पे सरकारी वकील बी.ऐ शिदे,एम पी ञिपाठी यांचा युक्तीवाद ऐकुण घेत माजी आ मुरकुटे यांना जामिन अर्ज मंजूर कण्यात आला आहे.

COMMENTS