Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री पाटणकर यांच्यावर सोशल मीडियावर अवमान; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

पाटण / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याविषयी म्हारवंड,

वन हदीतील लेंडीखत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार l LokNews24
श्री सिध्दनाथ देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ
परप्रांतीयांना डांबून ठेवल्याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

पाटण / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या
विषयी म्हारवंड, ता. पाटण येथील जगदीश बावधाने याने सोशल मिडीयावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या युवकास तात्काळ अटक करावी. अन्यथा पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार व पदाधिकारी यांनी पाटणचे पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दि. 17 नोव्हेंबर रोजी पाटण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व सातारा जिल्हा बँकचे संचालक श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन राज्याचे माजी मंत्री श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांचा एक लाईव्ह व्हिडीओ प्रसारीत करण्यात आला होता. या लाईव्ह व्हिडीओवर जगदीश
बावधाने (रा. म्हारखंड) याने राजकीय उद्रेक घडविण्याचे इराद्याने आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील हजारो लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारचा सामाजिक उद्रेक होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी त्यास तात्काळ अटक करुन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाटण विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. अन्यथा पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व सर्व दादांवर प्रेम करणार्‍यांतर्फे तीव्र आंदोलन व निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. दरम्यान, या निवेदनाची प्रत पाटणचे पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे यांना देण्यात आली आहे.

COMMENTS