Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड प्रत्येकाने काढून घ्यावे – डॉ विकास आठवले  

केज प्रतिनिधी - आयुष्यमान भारतचे डिजिटलहेल्थकार्ड,आभा, हे प्रत्येकाने काढून घेणे आवश्यक आहे या कार्ड द्वारेआपल्याआजारपणात याचे सहाय्य तर होईलच पर

Beed : बीड जिल्ह्यात मोबाईल व्हॅनचे आगमन (Video)
हिंदूच्या भाषणावर ब्राह्मण महासभा रागावली का ?
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मोडी लिपी कार्यशाळा संपन्न

केज प्रतिनिधी – आयुष्यमान भारतचे डिजिटलहेल्थकार्ड,आभा, हे प्रत्येकाने काढून घेणे आवश्यक आहे या कार्ड द्वारेआपल्याआजारपणात याचे सहाय्य तर होईलच परंतु आपली संपूर्ण हेल्थ हिस्ट्री सेव्ह राहील जेणे करून भविष्यात कुठेही आरोग्याची अडचणआली तर उपचार करणार्‍या डॉक्टरला तुमची आरोग्य विषयक तात्काळ याद्वारे माहिती मिळेल व उपचार करणे सोपेजाईल.यासाठी प्रत्येकाने आयुष्यमान भारतचे आभा कार्ड काढून घ्यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.

सध्या आजारपणात प्रचंड खर्च होतो व अचानक उद्भवलेल्या कठीण प्रसंगात आर्थिक व मानसिक तणाव प्रचंड वाढतो.अचानक आलेल्या प्रसंगातनातेवाईकगोंधळून गेलेले असतात अश्या परिस्थितीत मागील उपचार बाबतीत माहिती देणे शक्य होत नाही.अशा प्रसंगी आभा हेल्थ कार्ड हे आपला खूप मोठा मित्र बनून सोबत उभा राहतो. आभा कार्डमुळे आपल्या मागील आजारा संबंधित माहिती ही डॉक्टरला मिळते यामुळे तात्काळ योग्य उपचारकरण्यासाठी मदत मिळते.आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी  हीींिीं://हशरश्रींहळव.पवहा.र्सेीं.ळप या वेबसाईडवर लीशरींश -इक- वर जाऊन स्वतः काढून घ्यावे किंवा सीएससी सेंटर आपले सरकार केंद्रात जाऊन कार्ड काढून घ्यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे .  आभा कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांना आपल्या आधार कार्ड वरून काढता येते त्यामुळे प्रत्येकाने आभा कार्ड काढून घ्यावे,तसेच आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना कार्ड हे सी एस सी सेंटर वरून ई-केवायसी करून काढता येते यासाठी ग्रामपंचायत किंवा नगर पंचायत ,नगरपालीका आदीकडून योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कार्ड काढुन घेता येते व याद्वारे कुटुंबासाठी पाच लाखा पर्यंतची मदत सरकार कडून मिळते.तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक रेशन कार्ड धारकानाही महात्मा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत ही कुटुंबासाठी पाच लाखापर्यंतची मदत मिळतेअसेही डॉ.आठवले यांनी बोलताना सांगितले.

COMMENTS