जामखेड ः वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असून त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते. नागरिकांनी आपल्या पर्यावरणाची सुरक्षा करण्यासाठी किमान एक तरी
जामखेड ः वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असून त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते. नागरिकांनी आपल्या पर्यावरणाची सुरक्षा करण्यासाठी किमान एक तरी झाडं लाववे असे आवाहन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केले आहे. 13 जूलै रोजी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खर्डा येथील उपबाजार समिती आवारात सभापती शरद कारले यांच्या हस्ते आंबा, चिंच, नारळ अशा या लोकांना उपयुक्त असणार्या वृक्षांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक गौतम उतेकर, नंदकुमार गोरे, वैजिनाथ पाटील, भाजपाचे विधानसभा प्रमुख -कर्जत-जामखेड रविंद्र सुरवसे, खर्डा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड,पोलीस हवालदार संभाजी शेंडे, पोलीस कॉनस्टेबलशशी म्हस्के, बाळासाहेब खाडे, बाजार समितीचे कर्मचारी अक्षय भोगे, संतोष अनंते तसेच महेश दिंडोरे, नामदेव गोपाळघरे, व्यापारी आकाश कोरे, महेश बरे, परमेश्वर खोबरे, सौरभ खिंवसरा, मापाडी, शेतकरी शिवाजी गोपाळघरे, बाळासाहेब मिसाळ, नितीन ढाळे, कांतीलाल गोलेकर, अरुण गोलेकर, प्रकाश गोलेकर, संतोष जाधव, सतीश यादव आदि मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS